टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध देबिना बॅनर्जी आणि तिचा पती गुरमीत चौधरीसाठी हे वर्ष खूपच स्पेशल राहिले आहे कारण त्यांचं घर यावर्षी एक नाही तर दोनदोन वेळा आनंदाने भरून गेले आहे. जे अनेक वर्षे आईवडील होण्याचे सुख मिळवण्यासाठी तरसत होते. या यावर्षी त्यांना दोन मुलींचा आशीर्वाद मिळाला आहे आणि हे कपल दोन मुलींचे आईवडील बनले आहेत.
या वर्षी एप्रिलमध्ये देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरीने IVF तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांचं पहिल्या मुलीचे आईवडील झाले होते. देबिना एका मुलीची आई झाली होती. त्यानंतर मुलीच्या जन्माच्या एक महिन्यानंतरच देबिनाने आपल्या दुसऱ्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती आणि ती नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्या दुसऱ्या मुळीच आई झाली. देबिनासाठी दुसरी प्रेग्नंसी खूपच कठीण होती आणि तिचे नवजात बाळ वेळेच्या आधीच या जग्मध्ये आले.
देबिनाची दुसरी डिलिव्हरी सी सेक्शन द्वारे झाली आहे. अभिनेत्रीने आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरून एक व्हिडीओ शेयर करून चाहत्यांना तिच्या सी सेक्शनच्या डिलिव्हरीचा व्हिडीओ दाखवला आहे. या व्हिडीओमध्ये देबिनाने दाखवले आहे कि जेव्हा एक महिला आई बनते तेव्हा तिला किती वेदनांमधून जावे लागते.
देबिनाने शेयर केलेल्या व्हिडीओमध्ये तिचा पती गुरमीत चौधरी हे सांगताना दिसत आहे कि देबिना तिच्या सी सेक्शन डिलिव्हरीदरम्यान खूपच नरवस झाली होती. व्हिडीओमध्ये देबिना बॅनर्जीसोबत तो देखील ऑपरेशन थिएटरमध्ये पाहायला मिळत आहे. गुरमीत चौधरी भलेहि या व्हिडीओमध्ये देबिना बॅनर्जीला धीर देताना दिसत आहे पण त्याच्या चेहऱ्यावर देखील तणाव स्पष्ट दिसत आहे. कारण यावेळी देबिना बॅनर्जीची डिलिव्हरी सातव्या महिन्यामध्येच होत होती आणि वेळेच्या अगोदरच झालेल्या डिलिव्हरीबद्दल देबिना बॅनर्जीने देखील आपल्या व्हिडीओमध्ये सांगितले आहे.
विशेष म्हणजे देबिना बॅनर्जीची पहिली डिलिव्हरी नॉर्मल होती पण यावेळी तिला सी सेक्शनचा आधार घ्यावा लागला कारण यावेळी तिचे बाळ आतमध्ये हालचाल करू शकत नव्हते. देबिना बॅनर्जीने व्हिडीओमध्ये म्हंटले आहे कि बेबीचा आकार वेळेपेक्षा जास्त वाढला होता आणि यामुळे सी सेक्शन डिलिव्हरी झाली. सध्या देबिना आणि तिचे नवजात बाळ एकदम ठीक आहे.