गुरमीत आणि देबिना टीव्हीवरील चर्चित कपलपैकी एक आहे. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्रीने आपल्या दुसऱ्या मुलीला जन्म दिला होता. आता दोघांनी आपली दुसरी मुलगी देविशाचा चेहरा रीवील केला आहे. फोटोमध्ये दोघे आपल्या लाडक्या लेकीला कडेवर घेतलेले दिसत आहे. देबिनाच्या दुसऱ्या मुलीचा जन्म गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झाला होता. तिची मुलगी आता तीन महिन्यांची झाली आहे. या फोटोमध्ये तिने आणखी एक फोटो शेयर केला आहे ज्यामध्ये अभिनेत्रीचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे.
देबिना आणि गुर्मीतने जवळ जवळ तीन महिने आपल्या मुलीचा चेहरा दाखवला नव्हता. देबिनाची मुलगी देविशाचा चेहरा पहिल्यानंतर चाहते तिच्या फोटोवर क्युट प्रतिक्रिया देत आहेत. सर्वजण हे क्युट कुटुंब असल्याचे सांगत आहेत. देबिनाला दोन मुली आहेत. देबिनाच्या मोठ्या मुलीचा जन्म गेल्या वर्षी एप्रिलमध्ये आईवीएफ द्वारे झाला होता. यानंतर तिने नोव्हेंबरमध्ये दुसऱ्या मुलीला जन्म दिला होता.
देबिना आणि गुरमीत २००८ मध्ये पहिल्यांदा चर्चेमध्ये आले होते. या चित्रपटामध्ये त्यांनी राम आणि सीताची भूमिका केली होती. ज्यावर चाहत्यांनी भरभरून प्रेम केले होते. २०११ मध्ये दोघांनी लग्न केले होते आणि ११ वर्षानंतर दोघे आईवडील झाले होते. देबिनाने आई होण्यापूर्वी खूप वेदना सहन केल्या होत्या. एक व्हिडीओ शेयर करून तिने याचा खुलासा केला होता.
जेव्हा देबिना दुसऱ्यांदा प्रेग्नंट होती तेव्हा एका मुलाखतीदरम्यान गुरमीतने याचा खुलासा केला होता कि त्यांची इच्छा होती कि एकामागून एक त्यांना दोन मुले व्हावीत. जसे त्याच्या भावाला झाले होते, अभिनेता म्हणाला होता कि देबिना खूपच नशीबवान आहे, जिला देवाने पुन्हा एकदा आई होण्याची संधी दिली.
View this post on Instagram