देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी नुकतेच कोलकाताला रवाना झाले होते. देबिना आणि गुर्मीत कोलकातामध्ये मोठी मुलगी लियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पोहोचेल होते. यसाठी देबिना अनेक दिवसांपासून तयारी करत होती. याशिवाय तिने छोटी मुलगी दिवीशासाठी एक विधी देखील सेलेब्रेट केला.
देबिना बॅनर्जीने लियानाच्या बर्थडे सेलिब्रेशन आणि दिवीशाच्या मुखे भात विधीचे फोटो शेयर केले. लीयानाचा जन्म गेल्या वर्षी ३ एप्रिल रोजी झाला होता, तर दिवीशाचा जन्म १२ नोव्हेंबर रोजी झाला होता. लीयाना चौधरी आणि दिवीशा चौधरीदरम्यान फक्त ७ महिन्याचे अंतर आहे. देबिनाने मुलगी लीयानाचा पहिला वाढदिवस होमटाउन कोलकातामध्ये साजरा केला. यामध्ये देबीना-गुरमीतचा जवळचे मित्र आणि कुटुंबातील लोक सामील होते.
देबिना बॅनर्जीने लीयानासाठी एक अद्भुत थीम आधारित वाढदिवस साजरा केला. लियानाच्या जन्मापासून देबिना या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची तयारी करत होती. तिची इच्छा होती कि दोघी मुलींनी वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा.
लीयानाचा वाढदिवस खास करण्यासाठी मोठमोठे टेडी आणि फुग्यांनी संपूर्ण हॉल सजवण्यात आला होता. लीयाना एका लहान पारीसाठी दिसत होती. गुर्मीत चौधरी देखील मुलगी लीयानाच्या बर्थडेवेळी खूपच आनंदी दिसला. त्याने म्हंटले कि लीयाना त्यांच्यासाठी एका आशिर्वादासारखी आहे. त्यांना विश्वास बसत नाही आहे कि लीयाना १ वर्षाची झाली आहे.
दरम्यान देबिना आणि गुर्मीतने छोटी दिविशासाठी अन्न प्रश्न म्हणजेच मुखे भातच्या विधीचे देखील आयोजन केले होते. देबिनाचे म्हणणे आहे कि कोलकातामध्ये येऊन त्यांना हे दोन्ही सेलेब्रेशन एकत्र करायचे होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ती याचे प्लानिंग करत होती.
देबिना बॅनर्जीने मुखे भात सेरेमनीमधील एक सुंदर फोटो शेयर केला आणि लिहिले कि तुम्ही लोक माझ्याप्रमाणे दुसरा फोटो पसंद कराल. इथे एक छोटी झलक आणि ग्लॅमर आहे. ज्याप्रकारे मी आणि मिनीने दिवीशाचा मुखेभात (भात खाण्याचा विधी) सेलीब्रेट केला. देबिना बॅनर्जीने पुढे लिहिले आहे कि दिवीशा सर्व मामा (माझे भाऊ आणि चुलत भाऊ) येऊन तिला भरवले आणि आशीर्वाद दिला.
View this post on Instagram
View this post on Instagram