भारत एक असा देश आहे जिथे एकावेळ तुम्हाला प्रत्येक ऋतू आणि वातावरणाचा आनंद घेता येऊ शकतो. दक्षिणमध्ये डोंगराळ भागात थंडी, तर कधी आल्हाददायक वातावरण तर कुठे प्रखर उन. आपल्या संस्कृती आणि सणांमुळे देखील. भारत एक असा देश आहे जिथे अनेक लोक फिरायला मोठ्या प्रमाणात लोक येतात.
यामुळे पर्यटनाच्यादृष्टीने भारत एक समृद्ध देश आहे. यामध्ये देखील नॉर्थ ईस्टचे सौंदर्य असे आहे जे लोकांना नेहमी चकित करते. पर्यावरण पासून ते नदीपर्यंत सर्वामध्ये इतकी स्वच्छता आणि शुध्दता आहे कि विश्वासच बसत नाही कि हा भारताचा भाग आहे.
ट्विटरवरील @GoArunachal_ वर एक व्हिडीओ शेयर केला गेला आहे जो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही कि हा भारताचा भाग आहे. काचेप्रमाणे आरपार दिसणाऱ्या नदीवर तरंगणारी नाव, असे वाटते कि नाव हवेमध्ये उडत आहे. वास्तविक नदीचे पाणी इतके स्वच्छ आहे कि सर्व काही आर पार दिसते. व्हिडीओ पाहून लोकांना हैराणी होत आहे.
एकीकडे भारतामध्ये नदीच्या पाण्याच्या सफाईबद्दल मोठ मोठ्या मोहीम राबवण्यात येत आहेत. पण आतापर्यंत त्यामध्ये पूर्णपणे यश मिळालेले नाही. तर त्याउलट नॉर्थ ईस्टच्या राज्यांमध्ये इतकी सफाई आहे कि तुम्हाला विश्वास बसणार नाही.
सोशल मिडियावर मेघालयच्या डोकी नदीचा एक व्हिडीओ खूपच व्हायरल झाला आहे. जो पाहून लोकांना वाटत आहे कि नाव हवेमध्ये उडत आहे. पण नाव नदीमध्ये तरंगत आहे. इतकी स्वच्छता पाहून असे वाटते कि हे मोकळे आकाशच आहे. यामुळे हा व्हिडीओ सोशल मिडिया युजर्सला आपल्या सौंदर्य आणि स्वच्छतेमुळे आकर्षित करत आहे.
हा व्हिडीओ गो अरुणाचल नावाच्या प्रोफाईल वरून हा व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे. ज्यावर कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि तुम्ही भारतामध्ये उडणारी नदी पाहिली आहे का? नदीचे सौंदर्य पाहून मंत्रमुग्ध होतो. त्याचे कारण आहे स्वच्छ आणि चमकदार पाणी. ज्यामध्ये तुम्ही सर्वकाही आरपार पाहू शकता. या व्हिडीओला आतापर्यंत ३४ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे.
Have you ever seen this Flying boat in India?
Meghalaya 😍https://t.co/yWHSGjHp2h pic.twitter.com/wYG9TWLpSm
— Go Arunachal Pradesh (@GoArunachal_) February 2, 2023