आई आणि मुलीमध्ये जी बॉन्डिंग असते ती इतर दुसऱ्या नात्यामध्ये पाहायला मिळत नाही. मुलगी जेव्हा मोठी होते तेव्हा आईच तिची सर्वात जवळची मैत्रीण बनते आणि तिची प्रत्येक वेदना आणि गरज चांगल्या प्रकारे समजते. सोशल मिडियावर आई आणि मुलीची एक स्टोरी सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मुलीने आपल्या ५० वर्षाच्या आईचा एकटेपणा दूर करण्यासाठी तिचे ५० व्या वर्षी लग्न लावून दिले आहे.
आई आणि मुलीची हि स्टोरी मेघालयची राजधानी शिलॉग्सची आहे. मुलीचे नाव देबार्ती चक्रवर्ती आणि आईचे नाव मौशुमी चक्रवर्ती आहे. मौशुमीचे पती डॉक्टर होते पण जेव्हा मौशुमी जेव्हा २५ वर्षाची होती तेव्हा तिच्या पतीचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले.
पतीच्या मृत्यूच्या वेळी मौशुमी चक्रवर्तीची मुलगी देबार्ती फक्त दोन वर्षाची होती. मौशुमी आपल्या मुलीसोबत आपल्या घरामध्ये आली आणि टीचिंग करून आपल्या मुलीचा सांभाळ करू लागली. मौशुमीचे कुटुंबीय ती मोठी झाल्यावर तिला लग्न करण्यास सांगू लागले. पण ती नेहमी सांगून नकार द्यायची कि मी लग्न केले तर आईचे काय होईल.
देबार्ती फ्रीलांस टॅलेंट मॅनेजर आहे आणि ती मुंबईमध्ये काम करते. देबार्तीने सांगितले कि आपल्या आईला ती अनेक वर्षांपासून दुसरे लग्न करण्यासाठी राजी करत होती पण ती नकार देत होती. मुलीने आईला म्हंटले कि स्वतःसाठी मित्र बनव आणि चांगले वाटले तर एखाद्याला निवडून त्याच्यासोबत लग्न कर. इतक्या वर्षांनंतर जेव्हा मौशुमी ५० वर्षाची झाली तेव्हा मुलीच्या आग्रहामुळे ती दुसऱ्या लग्नासाठी तयार झाली आणि यावर तिने ५० वर्षाच्या स्वबपन नावाच्या बंगाली व्यक्तीसोबत लग्न केले. स्वबपनचे हे पहिले लग्न आहे.
देबार्तीने आजपर्यंत दिलेल्या आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले कि माझी आई खूपच खुश राहते. पहिली ती खूप चिडचिड करायची पण आता ती खूप बदलली आहे आणि आपल्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. देबार्तीला जेव्हा विचारले गेले कि तुला समाजाचा विरोध सोसावा लागला का तेव्हा ती म्हणाली कि समाज काय म्हणतो याची चिंता करू नये. आपण तेच करावे ज्यामध्ये आपण खुश राहतो. तिने म्हंटले कि माझ्यामुळे आईने दुसरे लग्न केले आहे त्यामुळे समाजाने देखील याला स्वीकारले आणि आईचा हा योग्य निर्णय होता.