दलीप ताहील एक असे अभिनेते आहेत ज्यांनी अनेक वर्षांपासून आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे कधी कधी खलनायकाच्या भूमिकेत तर कधी चांगल्या भूमिकेत दिसणारे दलीप ताहील आज त्यांना कोणी ओळखत नाही असे कोणी नाही. सांगितले जाते की त्यांनी त्यांच्या करिअर मध्ये आता पर्यंत १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे.
तसेच अजूनही त्यांना एक दृश्या साठी ट्रोल केले जाते. मिडिया रिपोर्टनुसार एका चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यान जया प्रदा सोबत रेप सीन चित्रित केले जाणार होते तेंव्हा दलीप ताहील भरकटले आणि जया ने त्याला थप्पड देखील मारली होती. आता अनेक वर्षानंतर एका मुलाखतीत दलीप ताहील ने या पूर्ण प्रकरणाची सत्यता सांगितली आहे.
त्यांनी एका मुलाखतीत या विषयी सांगितले आणि त्यातील सत्यता सर्वांसमोर सांगितली. त्यांनी सांगितले की असे कोणते दृश्य त्याच्यात आणि जया प्रदा च्यात चित्रित केले गेले नाही. कारण त्यांनी जया प्रदा सोबत कधी कामच केले नाही. सोबतच अभिनेत्याने हे देखील सांगितले की त्याला ही बातमी लिहिणाऱ्या बद्दल कोणतीही तक्रार नाही परंतु त्यांना वाटते की त्याला ते दृश्य एकदा दाखवले जावे ज्याबद्दल एवढे वर्ष लिहिले जाते.
प्रत्यक्षात, वर्षानुवर्षे मिडिया मध्ये लिहिले जात आले आहे की चित्रपट आखिरी रास्ता मध्ये जया प्रदा सोबत एक रे प सीन दलीप ताहील ला करायचा होता ज्याला अभिनेत्रीने करण्यास नकार दिला होता. जर त्या दृश्याला नकार दिला तर तिला त्या चित्रपटामधून काढून टाकण्यात येईल. तेंव्हा दलीप तयार झाले आणि चित्रीकरण केले गेले तेंव्हा ते ऐवढे भरकटले की जया प्रदा ने दलीप ताहिल ला थप्पड मारली.