एखाद्याचा जीव वाचवणे हे या जग्मधील सर्वात मोठे काम आहे, जे करण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला हि संधी मिळते तेव्हा ती गमवू नये कारण जीव वाचण्यापेक्षा जगामध्ये दुसरे कोणतेही मोठे पुण्य नाही. नुकतेच एका व्यक्तीसोबत अशीच घटना घडली जेव्हा एका अनोळख्या व्यक्तीने त्याला किडनी दान करून त्याचा जीव वाचवला. पण जेव्हा त्या व्यक्तीला माहिती झाले तेव्हा कि त्याला किडनी कोण दिली आहे तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आणि तो ढसाढसा रडू लागला.
@TheFigen_ या ट्विटर अकाऊंटवरून अनेक विचित्र व्हिडीओ नेहमी शेयर केले जातात. नुकतेच या अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेयर केला गेला आहे ज्यामध्ये एक व्यक्ती हॉस्पीटलमध्ये बेडवर झोपलेला दिसत आहे. माहितीनुसार व्यक्तीचे किडनी ट्रांसप्लांटचे ऑपरेशन झाले आहे.
माणसाच्या जर दोन्ही किडन्या खराब झाल्या तर एका किडनीवर देखील तो जिवंत राहू शकतो, पण किडनी मिळणे खूपच अवघड आहे कारण जे लोक किडनी दान करतात त्यांचे मन खूप मोठे असते आणि सत्य तर हे आहेकी इतके मोठे मन खूपच कमी लोकांचे असते.
व्हायरल व्हिडीओमध्ये जेव्हा त्या व्यक्तीला समजते कि त्याला किडनी दान करणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून त्याची मुलगीच आहे तर तो खूपच भावूक होतो आणि ढसाढसा रडू लागतो. लोक नेहमी आपल्या मुलगा व्हावा म्हणून नवस करतात कारण त्यांना वाटते कि मुलगी परक्या घरचे धन असते पण सत्य तर हे आहे कि आईवडिलांवर मुलीसारखे प्रेम कोणीच करू शकत नाही. ती त्यांच्यासाठी बलिदान देखील द्यायला तयार असते.
या व्हिडीओला सध्या ६ लाखापेक्षा जास्त व्हिव मिळाले आहेत. तर अनेक लोकांनी त्यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले आहे कि मुलीचे नशीब चांगले होते म्हणून तिचा रक्तगट जुळला आणि ती वडिलांना किडनी देऊ शकली, नाही तर अनेकवेळा अनोळखी व्यक्तींकडून किडनी घ्यावी लागते. एकाने म्हंटले आहे कि हि हृदयस्पर्शी घटना आहे.
She is one of the most wonderful daughters in the world. ❤️
Dad finds out that the anonymous kidney donor was his own daughter…pic.twitter.com/BNqQU4r5BZ— The Figen (@TheFigen_) February 27, 2023