गरिबीमुळे म्हणजेच कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने काही मुले त्यांचे बालपण व्यवस्थित जगण्याएवजी जबाबदारीचे ओझे उचलतात. अशावेळी वेळी त्यांना थोडीशी मदत मिळाली तर त्यांनाही या जगात थोडी शांतात मिळू शकेल. जरी तुम्ही एखाद्याचे नशीब बदलु शकत नसाल पण आपल्याकडून थोडेफार योगदान देऊन तुम्ही मुलांच्या चेहऱ्यावर काही क्षणांसाठी नक्कीच हसू पसरवू शकता.
आज आपण भारताऐवजी बोलणार आहोत, अफगानिस्तानातील व्हायरल विडीओ बद्दल ज्यामध्ये एका महिलेने, गरीब मुलाच्या चेहऱ्यावर आणले एक निवांत हास्य जे पाहून तुमचा दिवस चांगला जाईल. नाहीरा जिया नावाची एक वकील आणि समाजसेविका महिलेने जो विडीओ ट्विट केला आहे त्याची खास गोष्ट हि आहे कि यामध्ये तुम्हाला इतके निष्पाप आणि सत्य दिसेल जे तुम्ही याआधी कोणत्याही विडीओ मध्ये पाहिले नसेल.
विडीओ शेअर करत नाहीरा ने लिहिले, ‘हि मुलगी काबूलमध्ये पेन विकत होती जेणेकरून तिला तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवता आला पाहिजे. मी विचारले हे सर्व घेतले तर तू खुश होशील, तर तिने लगेचच स्मितहास्य करून होकार दिला’.
तर तुम्ही पाहिलंय का ती लहान मुलगी कशी सांगते एका पेनाची किंमत किती आहे. यांनतर त्या महिलेने तिला एक एक करून अनेक नोटा दिल्या. तेव्हा ती लहान मुलगी म्हणते कि हे पैसे तर जास्त आहेत तेव्हा महिला उत्तर देते कि हे तिच्या साठी भेट आहे. त्यानंतर ती मुलगी पैसे घेते आणि आनंदाने निघून जाते आणि जाताना एक अतिशय सुंदर स्मित हास्य करून निघून जाते.
Little Afghan girl in Kabul selling pens to support her family “ if I bought them all would you be happy?” She smiled and said yes #Afghanistan pic.twitter.com/KxqNl4HAc4
— Nahira ziaye (@Nahiraziaye) January 10, 2023