भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज ऋषभ पंत एका भीषण रस्ता अपघातात जखमी झाला आहे. वास्तविक तो दिल्लीहून रुरकी येथील त्याच्या निवासस्थानी जात होता. दरम्यान त्याच्या कारला वाटेत अपघात झाला. अपघात इतका भीषण होता कि कार अनियंत्रित होऊन प्रथम दुभाजकावर आदळली आणि नंतर जळून खाक झाली.
या अपघातामध्ये ऋषभ पंतला डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली. ऋषभ पंतला डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. माहितीनुसार, कोतवाली मंगलोर परिसरातील मोहम्मदपूर जाटजवळ पहाटे साडेपाचच्या सुमारास पंतच्या कारला अपघात झाला.
रुरकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंतला अचानक डुलकी लागली त्यामुळे अपघात झाला. त्याच्यासोबत ड्रायव्हर नव्हता. तो स्वत रुरकी येथे आपल्या कुटुंबियांकडे जात होता. सध्या त्याची प्रकृती ठीक आहे, तो बोलण्याच्या स्थितीमध्ये आहे.
जखमी ऋषभ पंतच्या म्हणण्यानुसार जेव्हा त्याला डुलकी लागली तेव्हा कार दरल डिव्हायडरला धडकली आणि कारने स्वतःहून पेट घेतला. क्रिकेटपटू दिल्लीहून रुरकीला येत होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी १०८ ला मदत मागितली आणि त्याला प्रथम रुरकी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर डेहराडूनला पाठवले.
माहितीनुसार दाट धुक्यामुले त्याचा अपघात झाला. भरधाव वेगात असणाऱ्या कारने डिव्हायडरला धडक दिली. अपघात इतका भीषण होता कि कारने त्वरित पेट घेतला. अपघातामध्ये पंतच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक लोकांनी पंतला कारमधून बाहेर काढले आणि त्यानंतर १०८ ला फोन मदत मागितली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
View this post on Instagram