HomeEntertainmentइतक्या करोडची संपत्ती मागे सोडून गेले राजू श्रीवास्तव, कार कलेक्शन पासून संपत्ती...

इतक्या करोडची संपत्ती मागे सोडून गेले राजू श्रीवास्तव, कार कलेक्शन पासून संपत्ती पर्यंत, आलिशान लाईफ जगत होते ‘गजोधर भैया’….

आजच्या काळामध्ये टीव्हीवर अनेक प्रकारचे कॉमेडी शो येतात, जे लोकांना खूप हसवण्याचे काम करतात. पण जर तुम्ही जरा मागे गेलात तर तुम्ही पाहायला प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव आपल्या स्टँड अप कॉमेडीने लोकांना हसवत होते. स्टेज शोपासून अनेक टीव्ही शो द्वारे ते लोकांन हसवण्याचे काम करत होते.

पण आता सर्वांना हसवणारे गजोधर भैया म्हणजेच राजू श्रीवास्तव या जगामध्ये नाहीत. जवळजळव ४० दिवसांपूर्वी त्यांना वर्कआउट दरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून ते दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल होते. आज त्यांचे निधन झाले आहे. आपल्या जीवनामध्ये त्यांनी खूपच प्रसिद्धी आणि संपत्ती मिळवली. चला तर त्यांच्या लाईफस्टाईल बद्दल जाणून घेऊया.

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव उत्तर प्रदेशच्या कानपुर जिल्यातील रहिवाशी होते. त्यांचा जन्म देखील तिथेच २५ डिसेंबर १९८३ रोजी झाला होता. इथून निघून त्यांनी आपली एक वेगळी ओळख बनवली आणि आपल्या गजब कॉमेडीने लोकांना खूप हसवले.

राजू श्रीवास्तव लहानपणापासूनच कॉमेडीयन बनू इच्छित होते. ज्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. यासाठी त्यांनी पुढे जाऊन कॉमेडीचा मार्ग निवडला आणि अनेक टीव्ही शो आणि स्टेज प्रोग्राम देखील केले. सुरुवातीला राजू ऑटो रिक्शा चालवत असत. यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये छोटे छोटे रोल देखील केले. इतकेच नाही तर अमिताभ बच्चनची मिमिक्री केल्यानंतर त्यांना पहिल्यांदा ५० रुपये मिळाले होते.

भलेहि राजू श्रीवास्तव यांचे वय ५८ वर्षे होते पण ते या वयामध्ये देखील स्वतःला फिट ठेवत होते. यासाठी ते दररोज जिमला देखील जात होते. वर्कआउट दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने ते बेशुद्ध झाले होते. राजू श्रीवास्तव हे साधेपणासाठी ओळखले जात होते आणि त्यांनी या ठिकाणी पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. त्यांच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्याजवळ बीएमडब्लू ३, मर्सिडीज, ऑडी क्यू७ आणि इनोवा कार होती.

राजू श्रीवास्तव यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांबद्दल बोलायचे झाले तर ते स्टेज शो, टीव्ही वरील कॉमेडी शो आणि चित्रपटांशिवाय अवॉर्ड शो होस्ट करून देखील चांगली कमाई करत होते. राजूने जाहिराती देखील केल्या होत्या. राजू श्रीवास्तवने आपल्या आयुष्यामध्ये प्रसिद्धीसोबतच त्यांच्या मेहनतीतून भरपूर संपत्तीही कमावली. माहितीनुसार राजू श्रीवास्तव जवळ जवळ १५-२० करोड रुपये संपत्तीचे मालक होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts