HomeBollywoodफिल्म इंडस्ट्री हादरली ! 'या' प्रसिद्ध बालाकालाकाराने घेतला जगाचा निरोप, चित्रपटाच्या रिलीजच्या...

फिल्म इंडस्ट्री हादरली ! ‘या’ प्रसिद्ध बालाकालाकाराने घेतला जगाचा निरोप, चित्रपटाच्या रिलीजच्या ४ दिवस अगोदरच झाले दुखद निधन…

गुजरातच्या एका छोट्या गावातील मुलाच्या लाईफवर आधारित छेलो शो चित्रपट ज्याचे नाव आत लास्ट फिल्म शो ठेवले गेले आहे, जो ऑस्कर अवॉर्ड २०२३ साठी पाठवला गेला आहे. हि बातमी ऐकल्यानंतर सर्वजण खूपच आनंदी होते. आता यासंबंधी एक वाईट बातमी समोर आली आहे. ती हि आहे कि चित्रपटामधील बालकलाकार राहुल कोळीचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी त्याने शेवटचा श्वास घेतला.

माहितीनुसार राहुलला ल्यूकेमिया झाला होता. ज्यामुळे त्याला २ ऑक्टोबरला अहमदाबाद कँसर रुग्णालयामध्ये भरती केले गेले होते. पण तो हि लढाई जिंकू शकला नाही आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्या निधनानंतर कुटुंबामध्ये आणि हप्पा गावाम्ह्ये शोकसभा ठेवण्यात आली होती.

त्याचे वडील रामू कोळीने म्हंटले कि, तो खूप खुश होता आणि इतकेच नाही त्याने सांगितले होते कि आपले आयुष्य १४ ऑक्टोबरनंतर पूर्णपणे बदलून जाईल. पण तो या अगोदरच आम्हाला सोडून निघून गेला. राहुलचे वडील ऑटोरिक्शा ड्राइवर आहेत आणि त्यावर त्यंची उपजीविका चालते.

ठीक १२ दिवस अगोदर फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे या गुजराती चित्रपटाला ९५ व्या अकॅडमी अवॉर्डमध्ये भारतातर्फे पाठवण्यात आले होते. छेलो शो यूएस बेस्ड दिग्दर्शक पैन नलिन उर्फ नलिन पांड्याचा सेमी बायोग्राफिकल चित्रपट आहे. ज्यामध्ये त्याच्या लहानपणापासून आतापर्यंतची जर्नी दाखवण्यात आली आहे. १३ ऑक्टोबरला हा चित्रपट लास्ट फिल्म शो नावाने हिंदीमध्ये रिलीज क्र्नाय्त येणार आहे.

राहुलचे गेल्या चार महिन्यापासून गुजरातगुजरात रिसर्च इंस्टीट्यूट अहमदाबाद येथे उपचार सुरु होते. त्याला ल्यूकेमिया होता. त्याच्या कुटुंबाला त्याच्या आजाराबद्दल चित्रपटाच्या शुटींगनंतर समजले. त्याला सुरुवातीला नॉर्मल ताप होता. उपचार केल्यानंतर देखील तो जात नव्हता. रविवारी ९ ऑक्टोबरला जेव्हा राहुलने ब्रेकफास्ट केला तेव्हा त्याला जास्त ताप आला. त्याला दिवसातून तीन वेळा रक्ताच्या उलट्याही झाल्या. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts