टीवी अभिनेत्री छवी मित्तल अशी अभिनेत्री आहे, जिला मागील काही दिवसांपूर्वी खूप पाहिले गेले. शेवटी गोष्ट देखील अशीच काहीशी होती कारण छवी ब्रे स्ट कँसर सारख्या गंभीर आजारावर मात करून परतली आहे. त्यानंतरच अभिनेत्री लोकांच्या नजरेत जास्त आलेली आहे. छवी ने अनेक मुलाखती देखील दिल्या आहेत. इंस्टाग्राम वर तिच्या शरीराला दाखवण्या बद्दल असंवेदनशील भाष्य केल्याबद्दल ट्रोल करणाऱ्यांना फटकारले देखील. त्यानंतर छवी मित्तल ने अलीकडील मुलाखतीत सांगितले आहे कि असे करण्या मध्ये माझा चांगला हेतू होता.
छवी मित्तल सांगते कि, ‘त्या ट्रोल करणाऱ्यांना फक्त कठोरच नाही तर हा संदेश द्यायचा होता कि हे माझे आयुष्य आहे, हे माझे शरीर आहे आणि मला त्यावर अभिमान आहे. त्यामुळे जेव्हा मी माझी क्लीवेज दाखवते, त्यामुळे नाही कि माझा अनादर व्हावा, फक्त यासाठी कि मी माझ्या ब्रे स्ट चा सम्मान करते आणि असे मानते कि ते एवढ्या मोठ्या सर्जरी नंतरही वाचल्यानंतर योद्धा आहेत. मित्तल ने हादेखील खुलासा केला कि उपचार झाल्यानंतर ती आणखीनच काळजीमध्ये होती. ४२ वर्षीय छवी ला ब्रे स्ट कँसर च्या उपचारामुळे एवढा त्रास झाला नाही, जेवढा कि ठीक झाल्यानंतरच्या जीवनामुळे होत आहे.
त्याची आठवण करताना कि कसे तिच्या डॉक्टरांनी तिला कसे बरे होण्याचे आश्वासन दिले होते, ती सांगते कि, ‘जेव्हा मला पहिल्यांदा कँसर झाल्याचे समजले होते आणि माझ्या डॉक्टरांनी मला विश्वास दिला कि माझा कँसर ठीक होऊ शकतो, मला विश्वास होता कि मी बरे होईन. परंतु माझी एकाच चिंता होती कि कँसर नंतर माझे जीवन कसे असेल. माझ्या मनामध्ये १०० विचार येत होते जसे कि कँसर नंतर मी कशी दिसेन आणि काय मी सुंदर दिसेन का नाही?
ती पुढे सांगते कि, ‘जर मी एखादी पोस्ट शेअर करते, जी एवढ्या प्रामाणिक पणे, स्वातंत्र्यपूर्ण, विना जबाबदारी, जगातील कोणत्याही गोष्टीची चिंता न करता कोणतीतरी गोष्ट सांगते आणि कोणतीतरी व्यक्ती काही गोष्टीच नोटीस करतो जसे कि मी त्यामध्ये काय घातले आहे, तर तो या मेसेज ला संपवून टाकतो कि मी हि पोस्ट कशासाठी टाकली आहे’.
छवी ने पुढे सांगितले कि, ‘मला माझ्या शरीरावर प्रेम आहे आणि माझे ब्रे स्ट त्याचा एक महत्वाचा भाग आहे. ते मला सुंदर आणि आत्मविश्वासु बनवतात’. ट्रोल करण्याबद्दल बोलताना छवी चे म्हणणे आहे कि ती जे सांगते किंवा लिहिते, त्यामुळे ती कधीही नाराज होत नाही. तिने सांगितले कि, ‘मी त्या लोकांना अथवा ते जीवनामध्ये काय करतात, ते माहित नाही. असे असू शकते कि ते कोणत्यातरी मेंटल अथवा भावनिक गोष्टीमधून जात आहेत आणि त्यामुळे सोशल मिडीयावर एवढ्या नकारात्मक गोष्टी बोलत असतात.
View this post on Instagram