सोशल मिडियावर आपल्या नेहमी गेम्स, क्विज आणि पजल पाहायला मिळतात. या गेम्समध्ये तुम्हाला एकतर फोटोमध्ये लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर कधी प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. लोकांना असे क्विज, गेम्स खेळायला खूप मजा येते. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहेत ज्यामधून तुम्हाला ५ फरक शोधून काढायचे आहेत.
तुमच्या समोर जे दोन फोटो आहेत ते दिसायला एक सारखेच आहेत. पण यामध्ये ५ फरक लपलेले आहेत. फोटोमध्ये तुम्हाला एक घर पाहायला मिळत आहे, घराच्या बाहेर दिवे लटकलेले दिसत आहेत, घराच्या आसपास गवत आणि झाडे दिसत आहेत. तुम्हाला आपल्या तीक्ष्ण नजरेने फोटोमधील फरक शोधून काढायचे आहेत.
अनेक लोक खूप प्रयत्न करून देखील फोटोमधील फरक शोधू शकलेले नाहीत. जर तुम्ही फोटोमधून ६ फरक शोधून काढलेत तर तुम्ही देखील खूपच जीनियस आहात. पण तुम्ही जर फरक शोधू शकला नाहीत तर काळजी करू नका आम्ही तुम्हाला मदत करतो.
दोन्ही फोटोंना लक्षपूर्वक पहा. पहिला फरक घराच्या वर असलेल्या छप्परजवळ आहे. एका फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कि एक त्रिकोण बनला आहे, पण दुसऱ्या फोटोमध्ये असे नाही. दुसरा फरक घराच्या बरोबर पाघीमागे असलेल्या झाडामध्ये आहे. एक झाड जास्त घनदाट आहे तर दुसरे कमी आहे. तिसरा फरक घराच्या डाव्या बाजूला लटकलेल्या दिव्यात आहे.
पहिल्या फोटोमध्ये दिव्याच्या खालच्या बाजूची डिझाईन दुसऱ्या फोटोमधील दिव्यापेक्षा वेगळी आहे. चौथा फरक घराच्या दरवाज्याच्या डाव्या बाजूला आहे. पाचवा फरक दरवाज्याच्या उजव्या भिंतीवर आहे. घराच्या दाराच्या उजव्या बाजूला भिंतीवरील पहिल्या फोटोत तुम्हाला शिडीसारखी वस्तू दिसेल. दुसरीकडे, दुसरीकडे तसे नाही.