बॉलीवूड अभिनेता सनी देओल सध्या त्यांच्या आगामी गदर २ च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. तो या चित्रपटाची वेगवेगळ्या लोकेशनमध्ये शुटींग करत आहे. सध्या या चित्रपटाची शुटींग अहमदनगर महाराष्ट्र येथे सुरु आहे. यादरम्यान सनी देओलचा एक चाहता त्याला बघून हैराण झाला.
अभिनेत्याने सोशल मिडियावर आपल्या चाहत्याचा एक व्हिडीओ आणि फोटो शेयर केला आहे. ज्यामध्ये तो सनी देओलला भेटून हैराण झालेला पाहायला मिळत आहे. सनी देओल सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहतो. तो नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यासोबत शेयर करतो.
त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्याचा एक फोटो आणि व्हिडीओ शेयर केला आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बैलगाडी चालवताना दिसत आहे. त्याला पाहून सनी देओल त्याला थांबवतो. तो खूपच लक्षपूर्वक अभिनेत्याला पाहतो. नंतर सनी देओल बैलगाडीवाल्याला हात मिळवून त्याची चौकशी करतो. दरम्यान ती व्यक्ती सनी देओलला म्हणते कि तुम्ही अगदी सनी देओल सारखे दिसत. यानंतर सनी देओल हसू लागतो आणि म्हणतो कि तो मीच आहे.
यावर ती व्यक्ती हैराण होते आणि म्हणते कि अरे बाप रे, आवाज देखील तोच आहे. नंतर तो त्याला पाहतच राहतो आणि म्हणतो कि मी तुमचे व्हिडीओ पाहतो. तुमच्या वडिलांचे व्हिडीओ देखील मोबाईलमध्ये पाहतो. सोशल मिडियावर सनी देओलने शेयर केलेला हा व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल झाला आहे. अभिनेत्याचे चाहते देखील हा व्हिडीओ खूप पसंद करत आहेत. त्याचबरोबर कमेंट करून प्रतिक्रिया देखील देत आहेत. गदर २ चित्रपट या वर्षी ऑगस्टमध्ये रिलीज होणार आहे.
View this post on Instagram