HomeBollywoodबोनी कपूरच्या पहिल्या पत्नीची मैत्रीण होती श्रीदेवी, बोनी कपूरला बांधायची राखी, नंतर...

बोनी कपूरच्या पहिल्या पत्नीची मैत्रीण होती श्रीदेवी, बोनी कपूरला बांधायची राखी, नंतर अशी बनली तिची सवत…

चित्रपट निर्माता बोनी कपूरचा जन्म ११ नोव्हेंबर १९५५ मध्ये झाला होता. ते बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध निर्मात्यांपैकी एक आहेत. बोनीने फिल्म इंडस्ट्रीला अनेक शानदार चित्रपट दिले आहेत. मिस्टर इंडिया, जुदाई, नो एंट्री सारख्या चित्रपटाचे निर्माता बोनीचे संपूर्ण कुटुंब फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे.

बोनी कपूरच्या पर्सनल लाईफसंबंधी बोलायचे झाले तर त्यांचे पहिले लग्न मोना शौरी कपूरसोबत झाले होते आणि तिच्यापासून त्यांना दोन मुले आहेत अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर. तथापि या दरम्यान बोनी कपूरच्या आयुष्यामध्ये श्रीदेवीची एंट्री होते आणि ते तिच्यावर फिदा होतात. श्रीदेवी बोनी कपूरच्या पहिल्या पत्नीची चांगली दोस्त होती आणि मोनीने श्रीदेवीला अनेक दिवसा आपल्या घरामध्ये देखील राहायला दिले होते.

तथापि यादरम्यान बोनी आणि श्रीदेवीचा रोमांस सुरु होता. बातमीनुसार मिथुनला श्रीदेवीवर प्रेम झाले होते आणि स्वतः अभिनेत्रीदेखील त्याच्यावर फिदा होती. अशामध्ये मिथुनला वाटत होते कि बोनी कपूर आणि श्रीदेवीमध्ये काहीतरी सुरु आहे. अशामध्ये श्रीदेवीने बोनी कपूरला राखी बांधली होती.

हि गोष्ट स्वतः बोनीची पहिली मोना कपूरने एका मुलाखतीमध्ये सांगितली होती. मोनाने सांगितले होते कि मिथुनला आपल्या प्रेमावर विश्वास दाखवण्यासाठी श्रीदेवीने बोनीला राखी बांधली होती जेणेकरून त्याला विश्वास होईल कि श्रीदेवी आणि बोनी कपूरमध्ये असे काहीही सुरु नाही.

बोनी कपूर स्वतः मिस्टर इंडिया चित्रपटासाठी श्रीदेवी जवळ रोल घेऊन गेले होते. यादरम्यान त्यांनी आपल्या मनातील गोष्ट श्रीदेवीसोबत शेयर केली होती आणि म्हंटले होते कि तिच्यावर प्रेम झाले आहे. ज्यानंतर ते अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करू लागले आणि बराच वेळ एकत्र घालवू लागले होते. बोनीची पहिली पत्नी मोनाला कधीच त्यांच्यावर शंका आली नाही कारण श्रीदेवी बोनीला आपला भाऊ मानत होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts