HomeBollywoodअफाट संपत्ती असून देखील हे बॉलीवूड स्टार्स वडीलधाऱ्यांच्या पाया पडण्यास कधीच मागे...

अफाट संपत्ती असून देखील हे बॉलीवूड स्टार्स वडीलधाऱ्यांच्या पाया पडण्यास कधीच मागे पुढे पाहत नाहीत, पहा फोटोज…

बॉलीवूडमधील असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या संस्कारासाठी ओळखले जातात बॉलीवूड असे काही कलाकार आहेत जे नेहमी वडिलधाऱ्या व्यक्तीचा सन्मान करतात. मग एखादा मोठा पुरस्कार सोहळा असो किंवा कार्यक्रम हे कलाकार वडिलधाऱ्या व्यक्तींचा सन्मान करत त्यांच्या पाया पडताना पाहायला मिळतात.

अक्षय कुमार बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील मोठ्या अभिनेत्यांपैकी एका आहे. त्याची विशेष आणि वेगळी ओळख आहे. अक्षय कुमार आपल्यापेक्षा वडिलधाऱ्या व्यक्तींचा नेहमी सन्मान करतो. अक्षय कुमार ४८ व्या फ़िल्म फ़ेस्टिवल दरम्यान अमिताभ बच्चनच्या पायाला स्पर्श करताना दिसला होता.

बॉलीवूडचा दबंग म्हणून ओळखला जाणारा सलमान खान आपल्यापेक्षा मोठ्यांचा सन्मानाची नेहमी काळजी घेतो. याशिवाय फिल्मी जगतामधील उदयोन्मुख अभिनेता म्हणून ओळखला जाणारा रणवीर सिंह आपल्यापेक्षा मोत्यांचे पाया पडण्यास कधीच लाजत नाही. बॉलीवूड अभिनेता रणवीर कपूर देखील अनेकवेळ मोठ्यांच्या पाया पडताना पाहायला मिळाला आहे. आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर करणे भारतीय संस्कृतीची वेगळी ओळख आहे आणि या संस्कृतीला कायम ठेवणे हि आपली जबाबदारी आहे.

बॉलीवूडमध्ये स्वतःला सिद्ध करणे खूपच मोठी गोष्ट आणि आणि त्या ओळखीला बनून ठेवणे एक खूप मोठी जबाबदारी आहे. हि ओळख टिकवून ठेवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. बॉलीवूड अभिनेता वरुण धवन भलेहि आजच्या जमान्यातील आहे पण आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचा सन्मान करणे त्याला चांगले माहिती आहे.

बॉलीवूड जगतातील किंग शाहरुख खान अनेक प्रसंगीत मोठ्या व्यक्तींच्या पाया पडताना पाहायला मिळाला आहे. प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्मा देखील डाउन टू अर्थ व्यक्ती आहे. मोठमोठे कलाकार अनेकदा त्यांच्या शोला भेट देतात. यादरम्यान तो आपल्या ज्येष्ठांच्या चरणांना स्पर्श करताना दिसला आहे.

बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन नेहमी आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीच्या पाया पडते. अशाच एका फंक्शनमध्ये जेव्हा तिच्या लहानपणीची डांस टीचर आणि प्रसिद्ध डांसर लता सुरेंद्रने वर्ल्ड कांग्रेस ऑन डांस रिसर्च कार्यक्रममध्ये ऐश्वर्याला समर्पित केले तेव्हा ऐश्वर्याने तिच्या पाया पडले होते. तिचा आनंद पाहण्यासारखा होता. ऐश्वर्या राय बच्चन चित्रपटामध्ये भलेहि रजनीकांतची हिरोईन राहिली आहे पण तरीही ती आपल्या सासऱ्याच्या मित्राचे पाया पडण्यास कधीच विसरत नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts