हिंदी चित्रपट इंडस्ट्री मध्ये टिकून राहण्यासाठी टेलेंट पेक्षा जास्त सेलिब्रिटी त्यांच्या सुंदरता आणि फिटनेस वर जास्त लक्ष ठेवून असतात. असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी इंडस्ट्री मध्ये पाय ठेवण्या अगोदर स्वतः ला पूर्ण बदलून टाकले. तसेच काहींनी सुंदर दिसण्यासाठी महागड्या कॉस्मेटिक सर्जरी, बोटोक्स, फिलर यांची सहायता घेतली आहे.
चेहऱ्यावर खर्च करण्याच्या बाबतीत स्टार किड मध्ये श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या दोन्ही मुली जान्हवी कपूर आणि ख़ुशी कपूर यांचे नाव समाविष्ट आहे. त्याव्यतिरिक्त त्यांची चुलत बहिण शनाया जिने अजून बॉलीवूड मध्ये पदार्पण केलेले नाही तिने देखील कॉस्मेटिक पासून तिच्या चेहऱ्यामध्ये बदल केला आहे. कमल हसन ची मुलगी श्रुती हसन आणि संजय दत्त ची मुलगी त्रिशाला दत्त देखील या यादीत सामील आहेत.
त्रिशाला दत्त : संजय दत्त ची मुलगी चे बॉलीवूड सोबत काहीही संबंध नाही, तिने अजून बॉलीवूड मध्ये पदार्पण केलेले नाही. ती खूप काळापासून अमेरिकेत रहात आहे. परंतु सोशल मिडीयावर तिचे आधीचे आणि आताचे फोटो वायरल होताना दिसत आहेत. त्रिशाला ने कॉस्मेटिक चा वापर करून चेहऱ्यामध्ये बदल केला आहे.
शनाया कपूर : संजय कपूर आणि महिप कपूर यांची मुलगी शनाया कपूर लवकरच बॉलीवूड मध्ये सुरुवात करणार आहे अलीकडेच तिला नवीन बदललेल्या लुक मध्ये पाहण्यात आले. असे म्हंटले जाते कि अभिनेत्रीने ओठांचा आकार बदलण्यासाठी कॉस्मेटिक ची मदत घेतली आहे.
ख़ुशी कपूर : श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी ख़ुशी कपूर आधी काही अशी दिसत होती कि तिला लोक जास्त ओळखत नसत. ती स्टार किड असल्यामुळे जास्त ग्लेमरस वाटत नसे. परंतु आता तिचा चेहरा पूर्णपणे बदलला आहे. तिने नाक आणि ओठांच्यात थोडा बदल केला आहे.
न्यासा देवगन : अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगन अलीकडे तिच्या सुंदर फोटोच्या मुळे चर्चेत येताना दिसत आहे. न्यासा आता बदललेली दिसत आहे. तिचा चेहरा आधीपेक्षा उजळला आहे आणि नाकाचा आकार देखील बदललेला वाटत आहे. माहितीनुसार न्यासा ने चेहऱ्यावर सर्जरी केलेली आहे. आणि चेहरा उजळणारे उपचार घेतले आहेत.