बॉलीवूडमध्ये सध्या एका नंतर एक लग्नांचे कार्यक्रम होताना दिसत आहेत. अनेक चित्रपट कलाकार मागील काही दिवसांपासून लग्नाच्या बंधनात अडकताना दिसत आहेत. सिद्धार्थ – कियारा देखील अलीकडे लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहेत. त्यांच्या अगोदर अथिया शेट्टी आणि केएल राहुल देखील सात फेरे घेतले आणि आणखी देखील सेलिब्रिटींनी मागील काही दिवसांत लग्न केले आहे. काहींनी जवळच्यांच्या उपस्थितीत तर काहींनी मोठ्या थाटामाटात केली. तर लग्नाच्या नंतर सर्वात जास्त चर्चा असते ती, अभिनेत्रींच्या लुक ची. लग्नाच्या नंतर सिंदूर, बांगड्या, बिंदी लावून जेव्हा या बॉलीवूड सुंदरी नववधू म्हणून पुढे आल्या, प्रत्येकाच्या हृदयाचा ठोका चुकला. तर आज आम्ही तुम्हाला काही अशाच सौंदर्यवती च्या लग्नानंतर च्या पहिल्या लुक बद्दल दाखवणार आहोत.
प्रियांका चोपडा- निक जोनास सोबत लग्नानंतर प्रियांका चोपडा पहिल्यांदा जेव्हा समोर आली, तिच्या देशी रुपामध्ये तेव्हा तिने सर्वांची मने जिंकली. निळ्या रंगाची साडी, मंगळसूत्र, सिंदूर लावलेल्या लुक मध्ये प्रियांका खूप छान दिसत होती. आपल्या लुकमुळे तिने सर्वांना खुश केले होते.
कतरिना कैफ- विकी कौशल सोबत लग्नानंतर कतरिना कैफचा नवीन नवरीचा लुक पाहण्यासारखा होता. तिने लग्नानंतर पेस्टल गुलाबी सूट घातला होता आणि तिच्या लुक ला मंगळसूत्र, सिंदूर आणि बांगड्या मध्ये पंजाबी नवरीचा लुक चाहत्यांना खूपच पसंत येत होता.
दीपिका पदुकोन- कायम स्टायलिश आणि वेस्टर्न लूकने चाहत्यांना चकित करणारी दीपिका, रणवीर सिंग सोबत लग्न केल्यानंतर मैचींग सुट मध्ये दिसली. परंतु, सर्वाधिक चर्चा होती ती तिच्या दुपट्टा आणि नव्या नवरीच्या अवताराची. बांगड्या. भांगात सिंदूर, मंगळसूत्र, दीपिका तिच्या लग्नानंतर च्या पहिल्या लुक मध्ये खूपच जबरदस्त दिसत होती.
अनुष्का शर्मा- विराट कोहली सोबत लग्नानंतर अनुष्काच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती. त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शन मध्ये ती एकदम देशी अंदाजात दिसली होती. बनारसी साडी, गळ्यामध्ये हार, टिकली आणि सिंदूर मध्ये खूपच सुंदर दिसत होती.
कियारा अडवाणी- बॉलीवूड मधील नवीन नवरी कियारा अडवाणीने तर कोणाला त्यांच्या लग्नाची माहिती देखील लागू दिली नाही. परंतु, जेव्हा ती लाल सुट घालून सासरी गेली, तेव्हा सगळीकडे तिचीच चर्चा होती. त्यादरम्यान तिने मंगळसूत्र आणि सिंदूर देखील घातले होते.