HomeBollywoodलक्झरी कार्स नाही तर सुपरबाईक्सचे दिवाने आहेत, बॉलीवूडचे ‘हे’ अभिनेते, पहा फोटोज...

लक्झरी कार्स नाही तर सुपरबाईक्सचे दिवाने आहेत, बॉलीवूडचे ‘हे’ अभिनेते, पहा फोटोज…

जेव्हा कधी बॉलीवूड स्टार्स च्या किंग साईज लाईफ बद्दल विषय निघतो, तर सामान्यतः त्यांच्या अलिशान घर आणि अलिशान गाड्यांची चर्चा होते. परंतु बॉलीवूडच्या काही स्टार्सच्या जवळ अशा काही गाड्या आहेत ज्यांची किंमत लाखांच्या आणि करोडोंच्या घरात आहे. तथापि सुपर बाईक्सचा दिवाना जॉन इब्राहीम सर्वात वर येतो, परंतु पठाण स्टार जॉन इब्राहीम च्या व्यतिरिक्त बॉलीवूड मध्ये असे काही स्टार्स देखील आहेत जे सुपर बाईक चे दिवाने आहेत. आम्ही तुम्हाला अशाच काही स्टार्स बद्दल सांगणार आहोत, जे सुपर बाईक्स वर करोडो रुपये खर्च करण्यापासून मागे पहात नाहीत.

शाहीद कपूर : वेब सिरीज ‘फर्जी’ मधून ओटीटी वर सुरुवात केलेल्या शाहीद कपूर जवळ अनेक अलिशान गाड्या आहेत. परंतु शहीद कपूर सुपर बाईक्स चा देखील खूप मोठा चाहता आहे. शाहीद त्याच्या कलेक्शन मध्ये फक्त सुपर बाईक्स ठेवत नाही तर त्याच्या मित्रांच्या सोबत रोड ट्रीप वर जाने पसंत करतो. शाहीद च्या जवळ बीएमडब्ल्यू ची सुपरबाईक आर १२५० जीएस एडवेंचर आहे ज्याची किंमत जवळपास १८.२५ लाख रुपये सांगितली जाते. त्याव्यतिरिक्त शाहीद च्या कलेक्शन मध्ये यामाहा एमटी ०१, हार्ले डेविडसन फेटबॉय आणि दुकाटी स्केम्बलर १२०० गाड्यांचा समावेश आहे.

सलमान खान : सलमान खान एक अलिशान जीवन जगण्यावर विश्वास ठेवतो. त्याच्या जवळ अनेक एसयुव्ही आणि सेडान लग्जरी गाड्या आहेत. परंतु सलमान खान च्या गेरेज मध्ये सुपर बाईक ची देखील खूप मोठी रांग आहे. या सुपर बाईक्स सलमान खान च्या पनवेल मधील घरी आणि मुंबई मधील अपार्टमेंट दोन्ही जागी ठेवल्या असतात. सलमान खान च्या जवळ सुपर बाईक यामाहा आर १ आहे ज्याची किंमत जवळपास २० लाख रुपये सांगितली जाते. त्याव्यतिरिक्त सलमान खान च्या जवळ हार्ले डेविडसन आणि ट्रम्प च्या बाईक्स देखील आहेत.

अक्षय कुमार : त्याचा चित्रपट ‘सेल्फी’ च्या पोस्टर मध्ये बाईक वर दिसणारा अक्षय कुमार सुपरबाईक्स चा चाहता आहे. त्याच्या जवळ यामाहा व्हीएमएक्स आहे, ज्याचा वापर त्याने २०११ मध्ये चित्रपट ‘देसी बॉईज’ मध्ये केला आहे. या गाडीला विकत घेण्यासाठी अक्षय कुमार ने २७ लाख रुपये खर्च केले आहे. त्याव्यतिरिक्त त्याच्या जवळ रॉयल एन्फिल्ड थंडरबर्ड ३५०, होंडा एक्सआरव्ही ७५० आणि एक हार्ले डेविडसन व्हि रॉड देखील आहे ज्याची किंमत लाखात सांगितली जाते.

कुणाल खेमू : पटौदी घराण्याचा जावई आणि बॉलीवूड अभिनेता कुणाल खेमू च्या जवळ बीएमडब्ल्यू आर १२५० जीएस एडवेंचर गाडी आहे ज्याची किंमत जवळपास १८.२५ लाख रुपये सांगितली जाते. कुणाल खेमू एका बायकर्स क्लब चा सभासद देखील आहे, जे बाईक्स वर रोड ट्रीप करतात. या बायकर्स क्लब चा हिस्सा शाहीद कपूर आणि ईशान खट्टर देखील आहे.

विद्युत जामवाल : विद्युत जामवाल हा त्याच्या एक्शन सीनमुळे अनेकदा चित्रपटांमध्ये चर्चेत असणारा विद्युत जामवाल च्या जवळ ट्रम्प रॉकेट ३ गाडी आहे, ज्याच्या सोबत तो इंस्टाग्राम वर फोटो देखील शेअर करत असतो. या सुपरबाईक ची किंमत जवळपास २० लाख रुपये सांगितली जाते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts