HomeBollywoodप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन, ६६ व्या वर्षी घेतला...

प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन, ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेता आणि प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. हि दुखद बातमी त्यांचे जवळचे मित्र आणि अभिनेता अनुपम खेर यांनी ट्वीट करून दिले. त्यांनी लिहिले कि मृत्यू हे जगातील अंतिम सत्य आहे मला माहित आहे पण हि गोष्ट माझा मित्र सतीश कौशिक साठी लिहीन हा कधीच विचार केला नव्हता.

अनुपम खेरने लिहिले आहे कि ४५ वर्षाच्या मैत्रीवर असा अचानक पूर्णविराम Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति. सतीश कौशिकने ६६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अनुपम खेरने आपल्या मित्राला श्रद्धांजलि देताना लिहिले कि सतीश तुझ्याशिवाय आयुष्य पहिल्यासारखे राहणार नाही.

सतीश कौशिक हे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता, विनोदी कलाकार, पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांचा जन्म १३ एप्रिल १९६५ रोजी हरियाणामध्ये झाला होता. बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वी त्यांनी थिएटरमध्ये काम केले. एक चित्रपट अभिनेता म्हणून सतीश कौशिक यांना १९८७ च्या मिस्टर इंडिया चित्रपटामधील कॅलेंडर भुमिकेमधून ओळख मिळाली. यानंतर त्यांनी १९९७ मध्ये आलेल्या दिवाना मस्तानामध्ये पप्पू पेजरची भूमिका साकारली होती. सतीश कौशिक यांना १९९० मध्ये राम लखन आणि १९९७ मध्ये साजन चले ससुरालसाठी सर्वोत्कृष्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

सतीश कौशिक यांचे शालेय शिक्षण दिल्लीत झाले. किरोड़ीमल कॉलेज मधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये प्रवेश घेतला. १९८३ मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९८५ मध्ये त्यांनी शशी कौशिकसोबत लग्न केले. मात्र लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या मुलाचे वयाच्या दुसऱ्या वर्षी निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts