नाना पाटेकर हे संपूर्ण बॉलीवूड मध्ये त्यांच्या दमदार अभिनय कौशल्यासाठी ओळखले जातात, नाना पाटेकर एक असे अभिनेता आहेत जे चौकटीच्या बाहेर काम करतात मग ती कॉमेडी असो वा एक्शन किंवा कोणताही दमदार अभिनय, नाना प्रत्येक शैलीत पारंगत आहेत.
हिंदी चित्रपटांच्या व्यतिरिक्त नाना पाटेकर मराठी चित्रपट देखील करतात. चला तर जाणून घेऊया नाना पाटेकर कशा प्रकारचे आयुष्य जगतात.
नाना पाटेकर साधे जीवन जगतात : नाना पाटेकर हे गेल्या ४ दशकापासून एक प्रस्थापित नाव आहे, नाना पाटेकर सुरुवातीपासूनच श्रीमंत नव्हते नाना यांचे म्हणणे आहे कि त्यांना हिरो त्यांच्या गरजांनी बनवले, त्यांच्या छंदाने नाही.
२५ एकर च्या फार्महाउस चे मालक आहेत नाना पाटेकर : नाना पाटेकर यांचे पुण्यात २५ एकराचे अलिशान फार्महाऊस आहे. या फार्म हाउस मधून नाना कमाई देखील करतात, इथे चित्रपटांचे चित्रीकरण देखील होते. नाना त्यांच्या फार्महाऊस मध्ये शेती देखील करतात, त्याव्यतिरिक्त त्यांनी ते खूप अलिशान पद्धतीने सजवले आहे.
१ बीएचके च्या फ्लेट मध्ये राहतात नाना : इतके श्रीमंत असूनही नाना पाटेकर अजूनही मुंबई मध्ये १ बीएचके फ्लेट मध्ये राहतात. नाना यांच्या या फ्लेट ची किम्मत अंदाजे ७ कोटी रुपये आहे. नाना यांच्या जवळ महिंद्रा स्कोर्पियो, ऑडी क्यू ७, रॉयल एन्फिल्ड सारख्या गाड्या देखील आहेत.