HomeBollywoodधर्मेंद्रच्या खांद्यावर दिसत असलेला ‘हा’ मुलगा आज बनला आहे बॉलीवूडचा सुपरस्टार, तुम्ही...

धर्मेंद्रच्या खांद्यावर दिसत असलेला ‘हा’ मुलगा आज बनला आहे बॉलीवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का…?

सोशल मिडियाने अनेक लोकांचे आयुष्य बदलून टाकले आहे. गेल्या काही वर्षांपासून याचा व्यापक पराभव आपल्या आयुष्यावर झाला आहे. बॉलीवूडवर देखील याचा परीणा आपल्याला पाहायला मिळतो. अनेक स्टार्सचे पर्सनल लाईफ आणि त्यांच्या बालपणाबद्दल आपल्याला काही माहित नसायचे. अशामध्ये आता नेहमी बॉलीवूडच्या मोठ्या स्टार्सचे फोटो आणि न ऐकलेले किस्से व्हायरल होतात. नुकतेच बॉलीवूडचे सुपरस्टार धर्मेंद्र सोबत एका मुलाचा फोटो व्हायरल झाला आहे. हा आता मुलगा चित्रपट आणि ओटीटी जगताचा स्टार आहे.

गेल्या २५ वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. तथापि त्याच्या बालपणीचा फोटो पाहून तुम्ही त्याला ओळखू शकणार नाही. फोटोमध्ये धर्मेंद्रच्या खांद्यावर जो मुलगा दिसत आहे तो १९९० च्या दशकातील स्टार राहिला आहे. बरसात आणि सोल्जर सारखे सुपरहिट चित्रपट त्याच्या खात्यामध्ये आहेत.

बालपणीचा निरागसपणा ५४ वर्षाचा झाल्यानंतर देखील अजूनहि त्याच्या चेहऱ्यावर आहे. त्याचे स्मित हास्य आणि सुंदर डोळे पाहून चाहते वेडे होतात. अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर त्याने ओटीटी वर डेब्यू केला. आश्रम सिरीजमधून त्याने चाहत्यांच्या मनामध्ये एक वेगळी ओळख बनवली.

अजून देखील तुम्ही त्याला ओळखू शकला नाहीत का. चला आम्ही तुम्हाला सांगतो. फोटोमध्ये धर्मेंद्रसोबत जो मुलगा आहे तो बॉबी देओल आहे. बॉबीचा मोठा भाऊ सनी देओल देखील सुपरस्टार आहे. सनीचाचा आगामी चित्रपट गदार २ लवकरच रिलीज होणार आहे. बॉबी देओलने धरम वीर चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती. हा चित्रपट १९७७ मध्ये रिलीज झाला होता. हा एक अॅक्शन चित्रपट होता ज्यामध्ये त्याने आपल्या वडिलांच्या बालपणीची भूमिका केली होती.

बॉबी देओलचे खरे नाव विजय सिंह देओल आहे. पासपोर्टवर देखील त्याचे नाव विजयच आहे. बॉबी देओलने वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी धर्मेंद्रच्या धरम वीर चित्रपटामध्ये एक बालकलाकार म्हणून काम केले होते. यानंतर त्याचा १९९५ मध्ये बरसात चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटासास्ठी त्याला बेस्ट मेल डेब्यू फिल्मफेयर अवॉर्ड मिळाला होता.

यानंतर बॉबी देओलने गुप्त, सोल्जर, बादल, बिच्छू, अजनबी आणि हमराज सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. ओटीटी जगतामध्ये बॉबी देओलने क्लास ऑफ ८३ आणि आश्रम सारख्या वेब सिरीजमधून वर्चस्व गाजवले. बॉबी देओलची बाबा निरालाची भूमिका खूपच गाजली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts