HomeBollywoodविचित्र कारण सांगत लग्नाच्या अवघ्या ६ महिन्यांमध्येच हे सेलेब्रिटी घेत आहेत घटस्फोट,...

विचित्र कारण सांगत लग्नाच्या अवघ्या ६ महिन्यांमध्येच हे सेलेब्रिटी घेत आहेत घटस्फोट, म्हणाले; आम्हाला ती मजा…

सोशल मिडिया इंफ्लूएन्सर आणि फैशन ब्लॉगर कृतिका खुराना ने लग्नाच्या सहा महिन्यांनतर घटस्फोटाची बातमी सांगितली आहे हे ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे. “देट बोहो गर्ल” नावाने प्रसिद्ध फैशन ब्लॉगर कृतिका खुराना ने सहा महिन्यापूर्वी तिचा पती आदित्य छाबडा सोबत मोठ्या धुमधडाक्यात लग्न केले होते आणि चाहत्यांनी त्यांच्या या जोडीला खूप पसंद देखील केले होते. कृतिका कायम तिच्या युट्युब चैनल वर पतीसोबतचे विडीओ शेअर करत असते ज्यात ते दोघे खूपच आनंदी दिसत आहेत. अशातच या बातमीने तिच्या लाखो चाहत्यांना खूपच दुखात टाकले आहे.

कृतिका ने मागील वर्षी सप्टेंबर २०२१ मध्ये तिच्या चाहत्यांसोबत लग्नाची बातमी शेअर केली होती. तिने चाहत्यांना सांगितले होते की ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत लवकरच लग्न करणार आहे. त्यानंतर प्रत्येकजण तिच्या लग्नाची वाट पाहत होते. कृतिका आणि आदित्य चे लग्न देखील मोठ्या धुमधडाक्यात झाले होते ज्याचे फोटो आणि विडीओ सोशल मिडीयावर खूप वायरल झाले होते.

कृतिका आणि आदित्य छाबडा यांच्यात विभक्त होणे अटळ आहे हे खूप वेळापासून चालू होते. अलीकडे आदित्य छाबडा ने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंट वरून कृतिका खुराना सोबत असलेले त्याचे सर्व फोटो काढून टाकले होते ज्यानंतर लोक त्यांचे संबंध तुटल्याचा अनुमान लावत होते. शेवटी कृतिका ने देखील या बातमीला दुजोरा दिलेला आहे आणि तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंट वर घटस्फोटाची बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

तिने तिचे चार फोटो शेअर करत खुलासा केला की तिने तिचा पती आदित्य सोबत वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर तिने तिच्या इंस्टाग्राम वर एक नोट देखील शेअर केली आहे ज्यात तिने लिहिले आहे की कशा प्रकारे तिने तिच्या लग्नाच्या सुरुवातीतील दिवसांमधील आपल्या आनंदाकडे दुर्लक्ष केले आहे. खूप साऱ्या गोष्टींचा त्याग केला आहे कारण ती कायम हाच विचार करायची की माझ्या या निर्णयावर लोक काय विचार करतील.

ती म्हणाली, “मी कायम खूपच रोमेंटिक राहायची आणि कायम राहीन, परंतु कधी कधी आयुष्यात आपल्याला खूपच कठीण निर्णय घ्यावे लागतात आणि आपल्या जवळ हे स्वीकार केल्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. जीवनातील हा टप्पा मला आणि माझ्या कुटुंबासाठी खूपच कठीण गेलेला आहे आणि मला आशा आहे की तुम्ही माझ्या स्थितीला समजून घ्याल. कृपा करून मला तुमचे प्रेम आणि आशीर्वाद द्या कारण मला हा प्रवास कायमचा संपवून टाकायचा आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kritika Khurana (@thatbohogirl)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts