HomeViralदिल्ली मेट्रोमध्ये बिकिनी घालून प्रवास करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल...

दिल्ली मेट्रोमध्ये बिकिनी घालून प्रवास करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल…

सोशल मिडियावर जे लोक सक्रीय आहेत त्यांना आतापर्यंत दिल्ली मेट्रोमध्ये बिकिनी घालून प्रवास करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ दिसलाच असेल. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर लोक अनेक प्रतिक्रिया देत आहेत. अनेक लोक तर तरुणीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत तर काहीजण तिच्या ड्रेसिंग सेन्सची तुलना सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदशी करत आहेत.

दिल्ली मेट्रोमध्ये बिकिनी घालून प्रवास करत असलेल्या तरुणीचे नाव रिदम चनाना आहे. तिला हवे ते ड्रेस घालेन हे तिचे स्वातंत्र्य असल्याचे ती म्हणते. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेयर करत लिहिले की, लोक तिला मॅसेज करून विचारत आहेत की तू मेट्रो वाली मुलगी आहेस का. प्रत्युत्तर देत चनना म्हणाली की हो मी ती मुलगी आहे.

एका मुलाखती दरम्यान चन्नाने सांगितले की, मी हे प्रसिद्ध होण्यासाठी किंवा पब्लिसिटी स्टंटसाठी केलेले नाही. लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही. जेव्हा तिला विचारण्यात आले की उर्फी जावेदपासून प्रेरित होऊन तू हे पाऊल उचलले आहे का? यावर चनना म्हणाली, कि मी तिला ओळखत नाही आणि मी तीच्यापासून प्रेरितही नाही. काही दिवसांपूर्वी एका मित्राने मला तीचा फोटो दाखवला होता. माझे कुटुंब रुढ़िवादी आहे. मला तिथे हे सर्व करण्याचे स्वातंत्र्य नाही. एके दिवशी मी ठरवले की मी तेच करेन जे माझे मन सांगेल. गेल्या अनेक महिन्यांपासून मी असाच प्रवास करत आहे. तिने सांगितले कि तिच्या कुटुंबातील लोक या प्रकाराने खूश नाहीत. शेजारीही त्यांना धमक्या देत आहेत. पण तिला याची पर्वा नाही.

व्हायरल झालेल्या व्हिडिओवर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे वक्तव्यही आले आहे. डीएमआरसीने सांगितले की सर्व प्रवाशांनी नियम आणि शिष्टाचारांचे पालन करणे अपेक्षित आहे. प्रवाशांनी असे कपडे घालू नयेत किंवा इतर प्रवाशांच्या संवेदनशीलतेचा अपमान होईल अशा कोणत्याही कृतीत सहभागी होऊ नये. DMRC च्या ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स कायद्याच्या कलम ५९ अंतर्गत अश्लीलता हा दंडनीय गुन्हा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts