बिग बॉस मराठीचा चौथा सीजन अधिक रोमांचक होत चालला असला तरी राखी सावंतने घरामध्ये एंट्री घेताच याची रोमांचकता आणखीनच वाढली आहे. राखी सावंत नेहमी काहीना काही करून चर्चेमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असते. राखी नेहमी चर्चेत राहून दर्शकांचे पूर्ण मनोरंजन करते.
राखीने बिग बॉस हिंदीच्या १५ व्या सीजनमध्ये देखील भाग घेतला होता. राखीसोबत अभिजित बिचुकले देखील पाहायला मिळाला होता. दरम्यान राखीने बिग बॉसच्या घरामध्ये अभिजित बिचुकलेसोबतच्या काही आठवणी देखील शेयर केल्या.
ती म्हणाली कि अभिजित खूपच लोकप्रिय होता. पण तो शो जिंकू शकला नाही. बिग बॉसच्या घरामध्ये तो फक्त झोपूनच असायचा. तो कोणत्याही टास्कमध्ये आणि खेळामध्ये भाग घ्यायचा नाही. त्याला जेव्हा वॉशरुम वापरायचे असायचे तेव्हा तो घरातील सर्व सदस्यांना वॉशरुममधून बाहेर काढायचा.
ती पुढे म्हणाली कि तो दिवसभर दात घासत नव्हता. तरीही माझ्या तोंडामधून बासुंदीचा सुगंध येतो असे म्हणायचा. आमच्यासोबत देवोलीना भट्टाचार्जी होती जी अभिजितच सगळं काम करायची. त्याच्यासाठी ती जेवण देखील बनवायची. बिचुकलेने सर्वात आधी तिला नॉमिनेट केलं होतं
यावर देवोलीना म्हणाली होती कि मी तुमची बेस्ट फ्रेंड आहे आणि मीच तुमचे कपडे धुतले तरीही मला तुम्ही का नॉमिनेट करताय. यावर बिचुकले म्हणाला होता कि मी तुलाच नॉमिनेट करणार तू घराबाहेर जा. बिग बॉस च्या चौथ्या सीजनला आता काची आठवडे शिल्लक राहिले आहेत. घरामध्ये टिकून राहण्यासाठी आता स्पर्धकांना नवीन काहीतरी करावे लागणार आहे. त्यामुळे या शोची रंजकता आता आणखीनच वाढणार आहे.
View this post on Instagram