फिल्म इंडस्ट्री हि अशी इंडस्ट्री आहे जिथे काही लोक हे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचतात तर काही लोकांना निराश होऊन परत जावे लागते. अनेकांना मोठी प्रसिद्धी मिळते. पण याच पडद्यामध्ये अनेक कलाकारांसोबत धक्कादायक प्रकार देखील घडले आहेत.
अनेक कलाकारांना का स्टिं’ग का उ’च’सारख्या घटनांना सामोरे जावे लागले आहे. साउथ फिल्म इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेत्री चारमिलालाही अशा अनुभवाचा सामना करावा लागला आहे. ४८ वर्षाच्या अभिनेत्रीने एका मुलाखती दरम्यान याचा खुलासा केला आहे.
मुलाखतीदरम्यान अभिनेत्री म्हणाली कि तिने नुकतेच एका मल्याळम चित्रपटाचे शुटींग पूर्ण केला आहे. याचे शुटींग कालिकतमध्ये करण्यात आले होते. या चित्रपटाचे निर्माते हे सगळे तरुणच होते. त्यांचे वय हे सुमारे २३-२५ वर्षे इतके असेल.
सुरुवातीला तो अभिनेत्रीला ताई म्हणत असे पण नंतर त्याने तीन दिवसांमध्येच अभिनेत्रीच्या सहाय्यकाशी संपर्क साधला आणि ए क रा त्र घालवण्यासाठी चक्क ५० हजार रुपयांची ऑफर दिली. या खुलास्या नंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. निर्मात्यांनी अभिनेत्रीकडे मागणी केली कि त्यांनी या कामासाठी त्यांच्यापैकी एकाची निवड करावी. तो तिच्या मुलापेक्षा मोठा होता पण त्यांनी काही ऐकले नाही. नंतर अभिनेत्रीने थेट फ्लाइट पकडली आणि ती चेन्नईला परत निघून आली.
यानंतर अभिनेत्रीने अशा व्यक्तींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. चारमिलाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर तिने तिच्या फिल्मी करियरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. नंतर १९९१ मध्ये तिने ओयलत्तम या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली होती.
तिने अनेक तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये देखील अनेक महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. १९९५ मध्ये तिने अभिनेता किशोर सत्यासोबत लग्न केले. पण अवघ्या चार वर्षाच्या संसारानंतर ती घटस्फोट घेऊन वेगळी झाली. त्यानंतर तिने २००६ मध्ये दुसरे लग्न केले. या लग्नानंतर तिला एक मुलगा झाला. पण अभिनेत्रीचे दुसरे लग्न देखील फार काळ टिकले नाही आणि २०१४ मध्ये घटस्फोट घेऊन ती वेगळी झाली. चारमिला आता तिच्या मुलासोबत एकटी राहते.