HomeViralइथे गायीच्या पोटामध्ये केले जाते मोठे होल, नंतर आतमध्ये हात घालतात लोक,...

इथे गायीच्या पोटामध्ये केले जाते मोठे होल, नंतर आतमध्ये हात घालतात लोक, कमकुवत हृदयाच्या लोकांनी पाहू नये व्हिडीओ…

भारतामध्ये गायीला मातेचा दर्जा दिला जातो. पण जगामध्ये इतर अनेक देशांमध्ये गायीसोबत असे काही केले जाते जे ऐकून कदाचित तुमचे होश उडतील. नुकतेच सोशल मिडियावर असेच काही फोटो व्हायरल झाले हेत ज्यामध्ये दाखवले गेले आहे गायीच्या पोटामध्ये मोठे होल करून असे काही केले जाते कि ज्यामुळे त्यांचे वय वाढते. पण लोक हे फोटो पाहून भडकले आहेत आणि विचारत आहेत कि गायीचे वय वाढवण्यासाठी हा कोणता उपाय आहे.

वास्तविक या प्रक्रियेला फिस्टुला म्हंटले जाते, याचा अर्थ छिद्रातून बनवलेला रस्ता असे होतो. माहितीनुसार हि प्रक्रिया अनेक वर्षांपासून वापरली जाते. हे अमेरिकी देशामध्ये खूप प्रचलित आहे. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे कि हे छिद्र गायीसाठी खूपच फायद्याचे असते. गायीच्य आतल्या भागाची तपासणी करणे खूपच कठीण आहे, या कारणामुळे गायीच्या पोटामध्ये एक मोठे छिद्र केले जाते. हे छिद्र प्लास्टिकच्या रिंगने बंद केले जाते आणि सर्जरीनंतर एका महिन्यामध्ये गाय पूर्णपणे कंफर्टेबल होते.

इतकेच नाही तर याद्वारे गायीच्या शरीरामध्ये वाढणाऱ्या आजारांबद्दल देखील योग्य तपासणी करता येऊ शकते. डेयरी उद्योगाशी संबंधी जाणकार सांगतात कि यामुळे गायींच्या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण खूप कमी आले आहे. तथापि याचा अधिकृत आकडा नाही. संशोधकांचे म्हणणे आहे की गायीच्या शरीरात एक मोठे छिद्र करून तिच्या शरीरातील आजारांची सहज तपासणी करता येते. या मोठ्या छिद्रातून गाईच्या पोटातील अन्न नीट पचते आहे की नाही हेही कळणे सोयीचे असते.

एका दुसऱ्या माहितीनुसार पीपल फॉर इथीकल ट्रीटमेंट ऑफ एनीमल्स (पेटा)ने याबद्दल काही दिवसांपूर्वी सांगितले होते कि गायीच्या पोटामध्ये बनवलेल्या या मोठ्या छिद्राला फिस्टुला म्हणतात. याद्वारे डॉक्टर गाईचे पोट स्वच्छ करतात आणि वाढणाऱ्या आजाराबाबत तपासतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts