बिग बॉसचा लोकप्रिय कंटेस्टेंट अब्दू रोजिकच्या एविक्शनछबी बातमी चाहत्यांमध्ये आगीसारखी पसरली आहे. पण अजून पर्यंत त्याला शोमधून हटवण्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अब्दू रोजिक बिग बॉस सीजन १६ मधील सर्वात आवडता कंटेस्टेंट आहे. या सीजनमुळेच त्याला २०२२ मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च केले गेलेल्या लोकांच्या लिस्टमध्ये जागा मिळाली आहे. अब्दूच्या जाण्याची बातमी एका प्रोमो व्हिडीओद्वारे समोर आली आहे ज्यानंतर #AbduRozik हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे.
सोशल मिडियावर सुरु असलेल्या गॉसिप्सनुसार अब्दू रोजिकला फक्त २ दिवसांसाठी बिग बॉसच्या घराबाहेर पाठवले जात आहे. यामागचे कारण आहे त्याची बिघडत असलेली प्रकृती, बिग बॉस हाऊसच्या बाहेर ट्रीटमेंट घेतल्यानंतर तो पुन्हा शोमध्ये परत येणार आहे.
View this post on Instagram
पण खरच असे होईल का ? किंवा अब्दूला मिळालेल्या मतांच्या कमतरतेमुळे त्याला बेदखल केले जात आहे ? हे येणारे एपिसोड पाहिल्यानंतरच स्पष्ट होईल. लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलायचे झाले तर कोणी अब्दूला सपोर्ट केले आहे तर कोणी म्हंटले आहे कि हा शोसाठी लायक नाही. एका युजरने लिहिले आहे कि मला वाटे हा शो अब्दूसाठी योग्य नाही, त्याला काही समजत नाही.
हेच योग्य राहील कि अब्दू शोमधून बाहेर जावा. एका चाहत्याने लिहिले आहे कि हा एक प्रँक आहे, कारण या आठवड्यामध्ये वोटिंग लाइन्स बंद होती. अशामध्ये कोणताही एविक्शन पॉसिबल नाही. तर अब्दूच्या जाण्याच्या बातमीने नाराज झालेले चाहते आपल्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये शेयर करत आहेत. एका युजरने लिहिले आहे कि मी प्रार्थना करेन कि तो पुन्हा परत यावा. तोच तर या सीजनचा महत्वाचा कंटेस्टेंट आहे. तर एका युजरने लिहिले आहे कि अब्दू ऐवजी साजिद खानला बाहेर काढले जावे, जेणेकरून अब्दू आपला गेम आपल्या पद्धतीने खेळू शकेल.
एका माहिती नुसार अब्दूच्या मॅनेजमेंट टीमने त्याला बिग बॉसच्या घराबाहेर येऊ देण्याची निर्मात्यांकडे परवानगी मागितली होती. त्यानंतर अब्दूला बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली. अब्दू रोजिकचा एक नवीन व्हिडीओ गेम प्रदर्शित होणार आहे, त्यासाठी त्याला त्याला शुटींग करायची असल्यामुळे त्याला घराबाहेर पडावे लागले. बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतर अब्दूने सोशल मिडियावर लाईव्ह सेशन केले होते. यामध्ये त्याने बिग बॉसमध्ये परत येणार असल्याचे देखील सांगितले. तो म्हणाला कि बिग बॉस उत्कृष्ट शो आहे. तुम्ही मला खूप प्रेम दिलं. त्याबद्दल धन्यवाद. मी नक्कीच शोमध्ये परत येईन. अब्दूच्या या बोलण्यावर चाहते आनंदी झाले आहेत. त्यामुळे आता अब्दू शुटींगनंतर बिग बॉसमध्ये कधी परततो याची सर्वजण वाट पाहत आहेत.
Best wishes to Abdu Rozik for his game. Hope to see him back in #BiggBoss16 once he completes shooting for his game part. pic.twitter.com/jTLoWM5pGq
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) December 17, 2022