HomeEntertainmentधक्कादायक ! प्रसिद्ध अभिनेत्रीची आत्महत्या, हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत अढळला मृतदेह...

धक्कादायक ! प्रसिद्ध अभिनेत्रीची आत्महत्या, हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत अढळला मृतदेह…

भोजपुरी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबेने वाराणसी येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. असे सांगितले जात आहे कि सारनाथ थाना क्षेत्र येथील सोमेंद्र हॉटेलमध्ये अभिनेत्रीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिनेत्री भदोही जनपद येथील चौरी थाना क्षेत्रमधील परसीपुरची रहिवासी होती.

या घटनेनंतर भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तिच्या कुटुंबियांना हे समजत नाही आहे कि आकांक्षाने इतके मोठे पाऊल का उचलले. आकांक्षा दुबेला जवळून ओळखणाऱ्यांच्या मते, ती वयाच्या तिसऱ्या वर्षी तिच्या आई-वडिलांसोबत मुंबईत शिफ्ट झाली होती. आई-वडिलांना तीला आयपीएस अधिकारी बनवायचे होते, पण तीचे मन नेहमी नृत्य आणि अभिनयात लागत होते. यामुळेच तिनेने मनोरंजन क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.

आकांक्षा दुबे एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. ती २१ ऑक्टोबरला आपला बर्थ डे सेलिब्रेट करत होती. तिने वीरों के वीर आणि कसम पैदा करने वाले की २ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. अकांक्षा सोशल मीडिया खूपच सक्रीय राहायची. इंस्टाग्रामवर आकांक्षा दुबेचे १.७ मिलियन फॉलोवर्स होते. इंस्टाग्रामवर तिने शेवटची पोस्ट जवळ जवळ १७ तासांपूर्वी शेयर केली होती. ज्यामध्ये ती ब्लॅक टॉप आणि ब्लू जीन्समध्ये पाहायला मिळत आहे.

व्हिडीओमध्ये ती एका गाण्यावर डांस करताना पाहायला मिळत आहे. व्हिडीओ पाहून कुठेही वाटत नाही कि ती असा व्हिडीओ शेयर केल्यानंतर आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलेल. आता या शेवटच्या पोस्टवर चाहते तिला ‘We will miss you, bhojpuri queen…we always miss you..#rip’ सारखे लिहून श्रद्धांजलि देत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts