भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टार रवी किशनच्या कुटुंबातून दुखद बातमी समोर आली. त्यांचे मोठे भाऊ राम किशन शुक्ला यांचे निधन झाले आहे. याची माहिती अभिनेत्याने आपल्या सोशल मिडिया अकाऊंट वरून शेयर केली होती. आता त्यांच्या भावावर अंतिम संस्कार करणायत आले आहेत. ज्याचे फोटो सोशल मिडियावर भोपुरी स्टारने शेयर केले आहेत. यासोबत त्यांनी खूपच इमोशनल पोस्ट देखील लिहिली हे. अभिनेत्याच्या मोठ्या भावाने मुंबईच्या हॉस्पीटलमध्ये आपला अंतिम श्वास घेतला. त्यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले.
भोजपुरीचे बिग बी म्हणून ओळखले जाणारे अभिनेता रवी किशन यांचेह मोहते भाऊ यांचं अंतिम संस्काराचे काही फोटो सोशल मिडियावर चाहत्यांसोबत शेयर केले आहेत. हे फोटो शेयर करण्यासोबत त्यांनी एक खूपच भावूक पोस्ट देखील शेयर केली आहे.
त्यांनी लिहिले आहे कि माझे मोठे भाऊ श्री राम किशन शुक्ला जी पंचतत्वमध्ये विलीन झाले. ज्यांच्या अंगाखांद्यावर मी खेळलो आज त्यांनाचा खांदा द्यावा लागत आहे. कदाचित देवाला देखील हेच मंजूर होते, आमच्यावर का रुसलात भाऊ, ओम शांती. त्यांच्या पोस्टवर आता चाहते कमेंट्स करत आहेत आणि त्यांना श्रद्धांजलि देत आहेत.
रवी किशन यांच्या कुटुंबावरील दुःखाचा डोंगर कमी होण्याचे नाव घेत नाहीये. राम किशन शुक्ला यांच्या अगोदर अभिनेत्याचे मोठे भाऊ रमेश शुक्ला यांचे निधन झाले होते. ते दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होते आणि दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांचे निधन झाले होते.
एका वर्षाच्या आतच त्यांच्या दोन्ही भावांना गमवल्याने त्यांच्या कुटुंबाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. हि त्यांच्या कुटुंबासाठी खूप मोठी दुःखाची वेळ आहे. श्रीराम किशन शुक्ला यांच्या जाण्याची कमी कोणीही भरून काढू शकत नाही. त्यांच्या निधनानंतर अभिनेत्याला मोठा धक्का बसला आहे.
रवी किशन हे जौनपूरचे आहेत. त्यांचे गाव बिसुई बराईमध्ये आहे. रवी देशातील एक चर्चित अभिनेता आणि नेता आहेत. ते सध्या गोरखपुरमधून भाजप खासदार आहेत आणि कुटुंबासोबत ते मुंबईमध्ये राहतात. ते भलेहि मुंबईमध्ये राहतात पण ते डाउन टू अर्थ व्यक्ती आहेत. अनेकवेळा ते पैतृक आवास जात राहतात. त्यांनी फक्त भोजपुरीच नाही तर हिंदी आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील काम केले आहे.
View this post on Instagram