भोजपुरी चित्रपटामधील सुपरस्टार आणि भाजप खासदार मनोज तिवारी यांच्या घरी सोमवारी एका मुलीचा जन्म झाला. अभिनेता वयाच्या ५१ व्या वर्षी तिसऱ्यांदा बाप झाला आहे. पत्नी सुरभीसोबत हॉस्पिटलमधील एक फोटो ट्विट करून अभिनेत्याने आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे कि माझ्या घरी लक्ष्मीनंतर सरस्वतीचे आगमन झाले आहे, हे कळवताना अतिशय आनंद होत आहे. आज घरात एका सुंदर मुलीचा जन्म झाला आहे. सुरभी-मनोज तिवारी, तुम्हा सर्वांचे तिला आशीर्वाद देवो.” या पोस्टनंतर मनोज तिवारी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मनोज तिवारीने गेल्या महिन्यामध्ये इंस्टाग्रामवर पत्नी सुरभि तिवारीच्या बेबी शॉवरचा व्हिडिओ शेयर करत हि गुड न्यूज दिली होती कि तो लवकरच पुन्हा एकदा बाप होणार आहे. त्याने सुरभीच्या बेबी शॉवरचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला होता.
लाल लेहेंग्यात सुरभी तिवारी बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली होती. व्हिडिओ शेअर करताना मनोज तिवारी यांनी लिहिले होते की, आम्ही काही आनंद शब्दात वर्णन करू शकत नाही.. आम्ही ते फक्त अनुभवू शकतो. मनोज तिवारी आणि सुरभी तिवारी यांचे हे दुसरे अपत्य आहे. मनोज तिवारी यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आहे. सुरभी हि मनोज तिवारी यांची दुसरी पत्नी आहे. याआधी त्यांनी राणी तिवारीसोबत लग्न केले होते. राणी आणि मनोज तिवारी यांनी रीती तिवारी नावाची मुलगी आहे.
२०१२ मध्ये मनोज आणि राणी तिवारी यांनी लग्नाच्या ११ वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. २०२० मध्ये मनोज तिवारीने सुरभीसोबत लग्न केले. या दोघांच्या घरी २०२० मध्ये पहिल्या मुलीचा जन्म झाला होता. तिचे नाव सानविका आहे. आता मनोज आणि सुरभी यांना आणखी एक मुलगी आहे.
बड़े हर्ष के साथ सूचित करना है कि मेरे घर में लक्ष्मी के बाद सरस्वती का आगमन हुआ है..आज घर में प्यारी सी बिटिया पैदा हुई है.. उसपे आप सभी का आशीर्वाद बना रहे.. सुरभि-मनोज तिवारी pic.twitter.com/JJj1H82XEr
— Manoj Tiwari 🇮🇳 (@ManojTiwariMP) December 12, 2022