मराठी फिल्म इंडस्ट्री अभिनेते भाऊ कदम हे दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. भाऊ कदम यांनी आपल्या अभिनयाने दर्शकांच्या मनामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या विनोदाचे टायमिंग आणि बोलण्याची वेगळी शैली यामुळे ते दर्शकांचे लाडके बनले. सध्या भाऊ कदम यांचा धुळवडचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि भाऊ कदम रंगाने माखलेले पाहायला मिळत आहेत आणि ते चक्क बँजो वाजवताना पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ धुळवडीच्या दिवशीचा आहे. जो त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे. भाऊ कदम यांचा कधीही न पाहिलेला अंदाज व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
व्हिडीओमध्ये भाऊ कदम यांच्यासोबत दिग्दर्शक विजू माने देखील पाहायला मिळत आहे. भाऊ कदम आणि विजू माने यांनी ‘सावन में लग गयी आग’ या गाण्यावर ठेका धरला आहे आणि दोघे बँजो वाजताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या आजूबाजूला अनेकजण धुळवडीचा आनंद घेत आहेत. भाऊ कदम याची हि कला पाहून चाहते त्यांचे कौतुक करत आहेत.
अनेक चाहत्यांनी कमेंट करत भाऊ कदम यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहेत. सध्या व्हिडीओवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. एका चाहत्याने लिहिले आहे कि अरेच्चा भाऊ किती सफाईतपणे वाजवत आहेत. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि, एकच नंबर भाऊ, किती भारी वाजवलात.
View this post on Instagram