HomeBollywoodफक्त ‘या’ एका अटीवर भारती सिंह करणार दुसऱ्या बाळाचे प्लानिंग, कॉमेडियनची अट...

फक्त ‘या’ एका अटीवर भारती सिंह करणार दुसऱ्या बाळाचे प्लानिंग, कॉमेडियनची अट ऐकून व्हाल थक्क…

कॉमेडियन भारती सिंह सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत जोडली गेली आहे. भारती आणि तिचा मुलगा लक्ष म्हणजेच गोला चे विडीओ देखील खूपच वायरल होत असतात. अलीकडेच भारतीचा एक विडीओ समोर आला आहे ज्यामध्ये तिने तिच्या दुसऱ्या मुलाबद्दलचे नियोजनावर बोलताना दिसत आहे.

व्हिडीओ मध्ये भारती सांगताना दिसत आहे की तिला दुसरे बाळ पाहिजे आहे परंतु त्यासाठी तिने एक अशी हमी मागितली आहे जे तिला कोणीही देऊ शकत नाही. बाळ गोला च्या संगोपनात व्यस्त असलेल्या भारती सिंह च्या या विडीओ ला तिच्या चाहत्याच्या पेज वरून शेअर केले गेले आहे.

या विडीओ मध्ये भारती म्हणते की, ‘मला मुलगी पाहिजे, लोक म्हणतात की दोन वर्षात दुसरे बाळ असायला पाहिजे. मी तयार आहे, परंतु जर मला कोणी हमी दिली की मुलगीच होणार म्हणून तर. मी स्वप्न पाहिले होते लहानसा फ्रॉक, मोठे हेअर बेंड, खूप साऱ्या क्लिप्स’. भारतीच्या या विडीओ वर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

एका युजर ने कमेंट करताना लिहिले आहे की, ‘भारती यावेळी तुम्हाला मुलगीच होईल, याची मी हमी देतो’. या कमेंट सोबत युजरने हसणारी इमोजी शेअर केली आहे. ज्यावरून वाटत आहे की चाहते देखील भारती च्या या गोष्टीवर तिच्या सोबत चेष्टा करत आहेत.

३ डिसेंबर २०१७ ला गोवा मध्ये विनोदी कलाकार हर्ष लिंबाचिया सोबत विवाहाच्या बंधनात अडकलेली भारती सिंह च्या मुलाचा जन्म ३ एप्रिल २०२२ ला झाला होता. भारती वर्किंग स्त्री आणि एक काळजी घेणारी आई आहे तिने पूर्ण गरोदर पणामध्ये काम करणे सोडले नाही. भारती सिंह ने बाळाच्या जन्माच्या शेवटच्या दिवसापर्यंत चित्रीकरण केले होते. अलीकडेच भारती सिंह ने तिच्या मुलाचा अन्नप्राशन समारोह ठेवला होता, ज्याचे फोटो सोशल मिडीयावर वायरल झाले होते.

भारती सिंह मुलाच्या जन्मानंतर मातृत्वाचा आनंद घेताना दिसत आहे. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया त्यांचा युट्युब चैनल देखील चालवतात ज्यावर ते त्यांचे वैयक्तिक जीवनाशी निगडील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. भारती सिंह अलीकडे अनेक टीवी मालिकांचा भाग बनलेली आहे आणि अजूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh🦋 (@bhartiisingh01)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts