भारती सिंह एक प्रसिद्ध कॉमेडीयन आणि अभिनेत्री आहे. भारतीने काही वर्षांपूर्वी हर्ष लिंबाचियासोबत लग्न केले होते आणि तिला एक मुलगा देखील आहे. भारती सिंह सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते आणि ती आपल्या प्रोफेशनल लाईफसोबत पर्सनल लाईफची झलक नेहमी चाहत्यांसोबत शेयर करते.
हर्ष आणि भारती एक यूट्यूब चॅनेल देखील चालवतात जे खूपच फेमस आहे. या चॅनेलवर भारतीने आपल्या प्रेग्नंसी डिलिव्हरीचा व्हिडीओ देखील शेयर केला होता. आता भारतीने इंस्टाग्रामवर एक नवीन व्हिडीओ शेयर केला आहे. ज्यामध्ये तिने एक खूपच खास ‘गुड न्यूज’ शेयर केली आहे. हि बातमी शेयर करून कपल खूपच खुश आहे.
कॉमेडियन भारती सिंहने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेयर केला आहे ज्यामध्ये एक खास ‘गुड न्यूज’ लपली आहे. हा व्हिडीओ भारती आणि हर्षचा मुलगा गोलाचा आहे ज्यामध्ये तो आपला पहिला शब्द बोलताना पाहायला मिळत आहे. नऊ महिन्याच्या गोलाने पहिल्यांदाच काहीतरी बोले आहे आणि हे रेकॉर्ड केले गेले आहे.
व्हिडीओमध्ये पाहू शकता कि हर्ष गोलाला रेकॉर्ड करत आहे आणि गोला भारतीच्या कुशीमध्ये आहे. भारती गोलाला मम्मा म्हणायला सांगण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याने पहिला शब्द पापा बोलला आहे. व्हिडीओमध्ये गोलाच्या तोंडातून पापा ऐकून हर्ष कॅमेऱ्याच्या पाठीमागून ओरडू लागतो आणि भारती तिच्या मुलाच्या तोंडातून पहिला शब्द ऐकून खूप खुश होते.
View this post on Instagram