कॉमेडियन आणि अभिनेत्री भारती सिंहला आज कोणाच्याही ओळखीची गरज नाही. आपल्या कामासोबत अभिनेत्री आपल्या पर्सनल लाईफमुळे देखील नेहमीच चर्चेमध्ये राहते. भारतीचे लग्न हर्ष लिंबाचियासोबत झाले आहे आणि गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दोघे एका मुलाचे आईवडील झाले होते ज्याला प्रेमाने सर्वजण गोला म्हणतात.
भारती आणि हर्षच्या मुलाचे नाव लक्ष्य सिंह लिंबाचिया आहे. लक्ष्य आता एक वर्षाचा झाला आहे म्हणजेच ३ एप्रिल २०२३ रोजी त्याचा पहिला वाढदिवस साजरा केला गेला. आपल्या मुलाच्या फर्स्ट बर्थडे निमित्त भारतीने त्याच्या बर्थडे फोटोशूटचे फोटोज शेयर केले आहे आणि त्याचबरोबर आपल्या लाडक्या मुलाला विश देखील केले आहे.
भारती सिंहने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या मुलाच्या वाढदिवसाचे फोटो शेयर केले आहे आणि त्याला पहिल्या बर्थडेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीने फोटोजसोबत एक क्युट कॅप्शन देखील लिहिले आहे. ज्यामध्ये लिहिले आहे कि वाढदिवसाच्या शुभेच्छा लक्ष्य (गोला); बाबू तुम्हाला खूप खूप प्रेम! आमच्यासारखे व्हा. देव तुम्हाला आशीर्वाद देईल!’ अभिनेत्रीच्या या पोस्टवर इतर अनेक सेलिब्रिटींनी गोलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
इथे तुम्ही पाहू शकता कि भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाने मुलाचे बर्थडे फोटोशूट केले आहे ज्यामध्ये त्यांचा गोला खूपच क्युट दिसत आहे. या फोटोशूटमध्ये दोनप्रकारचे फोटो आहेत. एकामध्ये गोला एका टोपलीमध्ये बसला आहे ज्यावर एक फुगा बांधला आहे आणि त्याच्यासमोर एक वनची प्लेट लावली आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये शेफचे कपडे घातले आहेत आणि तो किचन सारख्या एरियामध्ये बसून कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे.
View this post on Instagram