साडीची देखभाल करणे खूप कठीण काम आहे. आपला पदर आवरणे आणि एका तासाच्या प्रयत्नानंतर जे प्लेट्स बनवले आहेत त्याला सांभाळणे तर खूपच कठीण काम आहे. हेच कारण आहे कि सध्या मुली साडीपेक्षा वेस्टर्न ड्रेस घालणे जास्त पसंद करतात. काही लोक असे देखील आहेत ज्यांच्यासाठी साडी घालणे मोठी गोष्ट नाही. साडी सर्व वयोगटातील महिलांना पसंद आहे. आज आपण असा व्हिडीओ पाहणार आहोत ज्यामध्ये ट्विंकल चौरसिया नावाची महिला फिटनेस एन्थुजियास्टिक आहे.
ट्विंकल चौरसियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केलेला एक व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ती आपले स्नायू फ्लेक्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती एक मरून कलरची साडी घालून कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत ६०००० पेक्षा जास्त लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्विंकलची फिटनेस पाहून लोक हैराण झाले आहेत. अनेक लोकांनी तिला हे विचारले कि साडी घालून इतक्या चांगल्या प्रकारे वर्कआउट कशी करते. इतर लोकांनी लिहिले आहे कि ट्विंकलची फिटनेस सर्व महिलांसाठी एक प्रेरणादायी आहे.
व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्व विचारामध्ये पडले आहेत, कारण मुलीने जसे साडीमध्ये तिचे बायसेप्स दाखवले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. तिने एक नाही तर अनेक पोज बनवले जे पाहून लोकांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे. मुलगी उत्कृष्ट फिजीक शिवाय साडीमध्ये देखील खूप सुंदर दिसत आहे.
एका इंस्टाग्राम युजरने लिहिले आहे कि तुम्ही खूपच हॉट आणि क्युट दिसत आहात. तर एका दुसऱ्या युजरने लिहिले आहे कि तुझ्या शानदार फिटनेसवर मी फिदा झालो आहे. तर तिसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि सुपर पेक्षा वर.
View this post on Instagram