HomeEntertainmentटीव्ही इंडस्ट्री हादरली ! प्रसिद्ध अभिनेत्रीचे झाले निधन, गंभीर आजाराशी देत होती...

टीव्ही इंडस्ट्री हादरली ! प्रसिद्ध अभिनेत्रीचे झाले निधन, गंभीर आजाराशी देत होती लढा…

बंगाली टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली चक्रवर्तीचे निधन झाले आहे. तिने ३१ ऑक्टोबर रोजी कोलकाताच्या हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. माहितीनुसार असे सांगितले जात आहे कि ती अनेक दिवसांपासून आजारी होती.

अभिनेत्री या वर्षी ऑगस्टमध्ये हॉस्पिटलमध्ये भरती झाली होती. असे सांगितले जात आहे कि तिच्या पोटामध्ये पाणी भरले होते आणि लिवरमध्ये समस्या होती. सोनाली चक्रवर्तीने अनेक हिट बंगाली टीव्ही सिरियल्समध्ये काम केले आहे. यामध्ये गाटचोरा सिरीयल देखील सामील आहे.

तिने टीव्ही सिरीयलशिवाय चित्रपटांमध्ये देखील काम केले होते. २००२ मध्ये आलेल्या हार जीत चित्रपटामधून तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. सोनालीने बंधन चित्रपटामध्ये देखील काम केले होते. माहितीनुसार तब्येतीच्या समस्येमुळे ती गेले काही दिवस चित्रपट आणि सिरियल्समध्ये कमी काम करत होती.

सोनालीला या वर्षी ऑगस्टमध्ये हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले होते. त्यावेळी अशी बातमी आली होती कि ती लिवरच्या समस्येने ग्रस्त आहे. तिच्या पोटामध्ये पाणी भरले आहे आणि तिला खूपच समस्यांचा सामना करावा लागत आहे.

हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर ती सुरुवातीला ठीक झाली पण नंतर तिची तब्येत पुन्हा अचानक बिघडली. सोनाली चक्रवर्तीच्या निधनामुले बंगाली इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. कुटुंबातील लोकांना तिच्या जाण्याने मोठा धक्का बसल आहे. कोलकाताच्या एका हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. आता तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चाहते तिला सोशल मिडियाद्वारे श्रद्धांजलि देत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts