HomeEntertainment‘बालिका वधू’ फेम ‘या’ अभिनेत्रीने दिली गुड न्यूज, लग्नाच्या १० वर्षानंतर होणार...

‘बालिका वधू’ फेम ‘या’ अभिनेत्रीने दिली गुड न्यूज, लग्नाच्या १० वर्षानंतर होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत शेयर केला फोटो…

प्रसिद्ध टीव्ही अभिनेरी बालिका वधू फेम नेहा मर्दा (Neha Marda) ने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ती आई होणार आहे. नेहा मर्दाच्या घरी लवकरच लहानग्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. पतीसोबत अभिनेत्रीने बेबी बंप फ्लॉन्ट करत एक फोटो शेयर केला आहे. फोटोच्या कॅप्शन तिने “श्री शिवाय नमस्तुभ्यम्., शेवटी देव माझ्यामध्ये आला आहे. बेबी २०२३ मध्ये येणार आहे असे लिहिले आहे. रेड बॅकलेस ड्रेसमध्ये नेहा मर्दा खूपच सुंदर दिसत आहे.

फक्त चाहतेच नाही तर नेहा मर्दाला टीव्ही इंडस्ट्रीमधील तिचे मित्र आणि सेलेब्स देखील शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री चांदणीने कमेंट करत होणाऱ्या मम्मी-पप्पाला शुभेच्छा असे लिहिले आहे. श्रेनू पारिखने तुमच्या दोघांसाठी मी खूप खुश आहे असे लिहिले आहे. याशिवाय चाहत्यांनी देखील नेहा मर्दाला शुभेच्छा दिल्या आहेत.

नेहा मर्दा अनेक लोकप्रिय शोचा भाग राहिली आहे. यामध्ये सर्वात जास्त प्रसिद्धी तिला बालिका वधुमध्ये केलेल्या भूमिकेमुळे मिळाली. याशिवाय नेहा मर्दा क्यों रिश्तों में कट्टी-बट्टी, देवों के देव महादेव, एक हजारों में मेरी बहना है सारख्या सिरियल्समध्ये देखील दिसली आहे.

अभिनेत्रीने पटना बेस्ड बिजनेसमनसोबत २०१२ मध्ये लग्न केले होते. त्याचे नाग आयुष्मान अग्रवाल असे आहे. लग्नानंतर नेहा मर्दा मुंबईमध्येच राहू लागली आणि पती पटनामध्ये दोघांनी अनेक वर्षे लॉन्ग डिस्टेंस लग्न चालवले. तथापि प्रत्येक महिन्याला त्यांची भेट होत राहिली. वयाच्या ३७ व्या वर्षी नेहा मर्दा आई होणार आहे.

नेहा मर्दा गेल्या काही महिन्यांपासून पटनामध्ये राहत आहे. चार आठवड्यांपूर्वी नेहा मर्दा प्रेग्नंट असल्याची बातमी आली होती. त्यावेळी नेहाने म्हंटले होते कि ती अजून प्रेग्नंट नाही. तथापि बेबी प्लानिंग करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Marda (@nehamarda)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts