HomeEntertainmentसाउथ फिल्म इंडस्ट्रीमधून वाईट बातमी ! बाहुबली स्टार प्रभासच्या जवळच्या व्यक्तीचे निधन,...

साउथ फिल्म इंडस्ट्रीमधून वाईट बातमी ! बाहुबली स्टार प्रभासच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

साउथ चित्रपटामधील दिग्गज अभिनेता आणि माजी केंद्रीय मंत्री यू.वी कृष्णम राजू यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. यू.वी कृष्णम राजू यांचे ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी सकाळी जवळ जवळ ३ वाजून ४५ मिनिटांनी आपला शेवटचा श्वास घेतला. कृष्णम राजू यांना साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये रिबेल स्टार म्हणून ओळखले जात होते. शनिवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडली ज्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.

कृष्णम राजू बाहुबली स्टार प्रभासचे अंकल आहेत आणि या दु:खाच्या वेळी प्रभास त्याच्या काकांच्या कुटुंबासोबत उभा आहे. तर अभिनेत्याच्या निधनानंतर साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार त्यांना श्रद्धांजलि देत आहेत. साउथचा दिग्दर्शक मारुतिने देखील त्यांना श्रद्धांजलि दिली आहे.

त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले कि हे जाणून हे जाणून खूपच दु:ख झाले कि दिग्गज अभिनेता आणि रिबेल स्टार कृष्णम राजू आपल्यामध्ये नाहीत. प्रभास आणि त्याच्या कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत. देव कृष्णम राजू सर यांच्या आत्म्याला शांती देवो. तुम्ही आमच्या हृदयामध्ये नेहमी राहाल.

कृष्णम राजू यांच्या करियरबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी ते एक पत्रकार होते. १९९६ मध्ये त्यांनी चिलाका गोरनिका चित्रपटामधून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. आपल्या पहिल्याच चित्रपटामधून त्यांनी चाहत्यांचे मन जिंकले होते. या चित्रपटासाठी त्यांना नंदी अवॉर्ड देखील मिळाला होता. यानंतर त्यांनी दिग्गज अभिनेता एनटी रामा राव आणि अक्किनेनी नागश्वर राव यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. कृष्णम राजू यांनी जवळ जवळ १८३ चित्रपट केले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts