एसएस राजामौलीच्या बाहुबली चित्रपटामधील अभिनेत्री अनुष्का शेट्टी साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील टॉपची स्टार आहे. हेच कारण आहे कि संपूर्ण देशामध्ये तिचा मोठा चाहता वर्ग आहे. पण सध्या ती आपल्या लुकमुळे खूपच चर्चेमध्ये आली आहे. तिला आपल्या लुकमुळे ट्रोल व्हावे लागत आहे. तिचे लेटेस्ट फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. अनुष्काचे हे फोटो पाहून चाहत्यांना विश्वास बसत नाही आहे.
नुकतेच महाशिवरात्रिच्या प्रसंगी साऊथ सेंसेशन अनुष्का शेट्टी महादेवाचे दर्शन करण्यासाठी मंदिरामध्ये पोहोचली होती. यादरम्यान अभिनेत्री खूपच सिंपल लुकमध्ये पाहायला मिळाली. तिने पांढऱ्या राग्नाचा सूट घातला होता ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. इथूनच अनुष्काचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले.
तथापि अनेक लोकांचे लक्ष अनुष्काच्या वाढलेल्या वजनाने वेधून घेतले. आता सोशल मिडियावर लोक बॉडी शेमिंगबद्दल अनुष्काला खूपच ट्रोल करत आहेत. इतकेच नाही तर अनेक युजर्स तिला सलीम होण्याचा सल्ला देखील देत आहेत. अनेक दिवसांनंतर जिथे अनुष्काचे चाहते तिला पाहून खूप खुश आहेत तर अनेक युजर्स तिला ट्रोल करत आहेत.
तिच्या फोटोवर कमेंट करत एकाने लिहिले आहे कि, तू जरादेखील चांगली दिसत नाही आहेत, प्लीज सलीम हो. तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे कि तुम्हाला आम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिले आहे प्लीज फिट राहा. अनुष्काच्या वर्कफ्रंटबदल बोलायचे झाले तर ती लवकरच साऊथच्या चंद्रमुखी २ चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे.
Anushka Shetty recent clicks. Lost all hope 🥺 pic.twitter.com/6VTZvzsTxQ
— Kritifeed (@Kritifeed) February 18, 2023