HomeBollywood५६ वर्षाच्या 'या' अभिनेत्याने ३३ वर्षाने लहन अभिनेत्रीसोबत गुपचूप केले लग्न, पत्नीसोबत...

५६ वर्षाच्या ‘या’ अभिनेत्याने ३३ वर्षाने लहन अभिनेत्रीसोबत गुपचूप केले लग्न, पत्नीसोबत देखील…

प्रसिद्ध साउथ इंडियन अभिनेता बबलू पृथ्वीराज बद्दल अशी बातमी ऐकायला मिळत आहे की, जे तुम्हाला चकित करतील. बातमी ही आहे की विवाहित अभिनेता ने २३ वर्षाच्या मलेशियन मुली सोबत गुपचूप विवाह केला आहे. या गोष्टीमध्ये किती सत्यता आहे हे माहिती नाही कारण अभिनेत्याच्या बाजूने अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु शोबिझ इंडस्ट्री मध्ये या बातमीमुळे निश्चितच खळबळ उडाली आहे.

५६ वर्षाच्या अभिनेत्याने २३ वर्षाच्या मुलीसोबत दुसरे लग्न केल्याची बातमी आगी सारखी पसरत आहे. मुलगी अभिनेत्यापेक्षा ३३ वर्षांनी लहान आहे. बबलू पृथ्वीराज आधीपासूनच विवाहित आहे. त्याच्या पत्नीचे नाव बिना आहे. १९९४ मध्ये दोघांचे लग्न झाले होते. या लग्नामधून दोघांना एक मुलगा देखील आहे ज्याचे नाव अहेद आहे. त्याचे वय २७ वर्ष सांगितले जात आहे. मिडिया रिपोर्ट नुसार, बबलू चे बिना सोबत वैवाहिक जीवन चांगले चालत नव्हते. त्यांच्या मुलाच्या तब्बेतीच्या कारणामुळे बबलू आणि बिना यांच्यात वैयक्तिक जीवनात खूप मतभेद चालू होते. अहेद आजारी असतो, तो ओटीस्टिक आहे.

तथापि रिपोर्ट असे पण सांगतात की बबलू आणि बिना काही वर्षांपूर्वी वेगळे झाले आहेत. कारण की त्यांच्यातील वाद विवाद मिटत नव्हते त्यामुळे त्यांनी वेगवेगळे रस्ते निवडले. बबलू आणि बिना यांनी खूप वर्ष दोघांनी त्याच्या तब्बेतीची काळजी घेण्यासाठी प्रयत्न केले. तथापि पहिले लग्न तुटण्याचे अभिनेत्याने अजून पुष्टी केलेली नाही.

बबलू पृथ्वीराज तमिळ चित्रपट आणि मालिकांमधील एक प्रसिद्ध नाव आहे. खलनायकाच्या आणि पात्र भूमिकेमध्ये बबलू चांगले काम करून आपली ओळख निर्माण केली आहे. त्याने फक्त तामिळच नाही तर तेलुगु, कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने बालकलाकार पासून आपल्या कामाची सुरुवात केली आहे. त्याचा पहिला चित्रपट नान वझंवैप्पेन होता. अभिनेता म्हणून बबलू ने १९८० मध्ये सुरुवात केली. पडद्यावर त्याला खलनायकाच्या भूमिकेतून ओळख मिळाली. बबलू खूप साऱ्या टीवी मालिकांचा देखील हिस्सा बनलेला आहे. त्याने डान्स रियालिटी शो जोडी नंबर वन मध्ये सहभाग घेतला होता. बबलू पृथ्वीराज १०० पेक्षा जास्त साउथ इंडियन चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अभिनेता तब्बेतीच्या बाबतीत खूपच गंभीर आहे. ५६ वय असून देखील बबलू ने त्याची तब्बेत खूपच चांगली ठेवलेली आहे. बबलू इंस्टाग्राम वर त्याचे व्यायामाचे फोटो आणि विडीओ धेअर करत असतो. पाहूया दुसऱ्या लग्नाबद्दल बबलू पृथ्वीराज काय प्रतिक्रिया देतो ते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Babloo Prithiveeraj (@prithiveeraj)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts