HomeViralबुलेटच्यामागे ठेला लावून रस्त्याच्या कडेला पाणीपुरी विकते हि मुलगी, पाणीपुरी खाण्यासाठी लागते...

बुलेटच्यामागे ठेला लावून रस्त्याच्या कडेला पाणीपुरी विकते हि मुलगी, पाणीपुरी खाण्यासाठी लागते लाईन…

एमबीए चायवाला आणि बीटेक चायवाली पाहिल्यानंतर ग्रॅजुएट स्टॉल मार्केटमध्ये आणखीनच वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. एक नवीन स्पर्धक यामध्ये आता सामील झाला आहे आणि असे वाटते कि ती लवकरच मार्केट काबीज करेल. व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि रॉयल एनफील्ड बुलेटवरून दिल्लीच्या रस्त्यावर एक मुलगी फिरताना दिसत आहे.

मुलीने आपल्या बुलेटच्या मागे एक ठेला देखील बांधला आहे आणि ती पाणीपुरीचा छोटा स्टॉल लावून रस्त्यावरच पाणीपुरी विकते. तिने आपल्या ठेल्याचे नाव बीटेक पाणीपुरी वाली ठेवले आहे आणि तिला पाहिल्यानंतर सोशल मिडिया युजर्स देखील हैराण झाले आहेत.

ती आपल्या बिजनेसबद्दल खूपच गंभीर आहे आणि फॅन्सी ठेल्यावर साफ-सफाई आणि हेल्दी स्ट्रीट फूड विकण्याचे तिचे टार्गेट आहे. दिल्लीच्या रस्त्यावर असे खूपच कमी प्रमाणात पाहायला मिळते. व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बीटेक पाणीपुरीवालीने आपले नाव तापसी सांगितले आहे. ती म्हणाली कि पुरी ती कधीच तेलामध्ये तळत नाही तर त्यासाठी ती एयर फ्रायरचा वापर करते आणि मैदा न घालता पाणीपुरी विकते. यानंतर ती आपल्या स्वादिष्ट पाण्याबद्दल देखील सांगते.

तापसीने सांगितले कि तिने पाण्यामध्ये टेस्टी मसाले मिसळले आहेत जे सामान्यतः दुकानांवर विकल्या जात असलेल्या पावडरपेक्षा हाताने चोळून बनवले जाते. ती इतर विक्रेत्यांद्वारे वापरल्या जाणार्याा कार्डबोर्ड शिवाय पर्यावरणाशी अनुकूल पातळ वाटीमध्ये आपली पाणीपुरी वाचते. व्हिडीओमध्ये तापसीने खुलासा केला कि तिच्या तिच्या व्यवसायाला समर्थन देत नाही. ती म्हणते कि अनेक लोक मला म्हणतात कि मी बीटेक ग्रॅज्युएट आहे आणि मी एक महिला आहे म्हणून मी रस्त्यावर पाणीपुरी विकू नये. मी घरी जाऊन काम केले पाहिजे, पण मी कधीही कोणाकडे लक्ष दिले नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Are you hungry (@are_you_hungry007)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts