पाकिस्तानी क्रिकेट टीम चा कप्तान शोएब मलिक आणि भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्जा यांच्यात सगळे काही व्यवस्थित चालु नाही. मागील काही काळापासून अशा बातम्या येत आहेत कि शोएब आणि सानिया यांच्यात घटस्फोट होणार आहे. तथापि त्याबद्दल शोएब आणि सानिया यांच्याकडून अजूनपर्यंत कोणतीही ठोस माहिती आलेली नाही.
अशातच दोघे सोबत एका नवीन शो मध्ये पाहायला मिळाले.मिडिया रिपोर्ट नुसार शोएब आणि सानिया यांच्या घटस्फोटाला कारणीभूत आयशा ओमर ला सांगितले जात होते परंतु आता पाकिस्तानी अभिनेत्रीने आपले तोंड उघडले आहे. अलीकडे शोएब मलिक आणि आयशा ओमर चे काही फोटो सोशल मिडीयावर वायरल होताना पाहायला मिळाले. फोटो मध्ये दोघे एकमेकांच्या खूपच जवळ येताना पाहायला मिळाले.
आयशा ने अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शोएब मलिक सोबतचे तिचे संबंध यावर आपले मौन सोडताना सांगितले कि यामध्ये कोणतेही सत्य नाही. आयशा म्हणाली कि, ‘मला समजत नाही कि यामध्ये माझे नाव का घेतले जात आहे. शोएब च्या सोबत माझे फोटो शूट एक वर्ष आधी झाले होते. मिडिया ने याचा गैर वापर केला आहे. आमच्या दोघांच्यात कोणतेही संबंध नाहीत.
घटस्फोटाच्या बातम्यांमध्ये शोएब मलिक ने मागील काही दिवसांपूर्वी सांगितले होते कि हा त्यांचा खाजगी विषय आहे. शोएब मलिक ने तेव्हा न्यूज रिपोर्ट ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या घटस्फोटा बद्दल चाललेल्या बातम्यांवर म्हणाला होता कि तो त्याच्या खाजगी जीवनामध्ये मिडीयाच्या हस्तक्षेपामुळे नाराज आहे.