९० च्या दशकामध्ये अभिनेत्री आयशा जुल्का चा जलवा होता. तिच्या करिअर मध्ये आयशा अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. परंतु लग्नाच्या नंतर आयशा ने करिअर सोडले आणि कुटुंबावर लक्ष देण्यास सुरुवात केली. तथापि आता अभिनेत्रीने परत आली आहे. पण या रिपोर्ट मध्ये आपण आयशा च्या वैयक्तिक जीवनावर एक नजर टाकणार आहोत. तुम्हाला माहिती आहे काय अभिनेत्रीच्या १९ वर्षाच्या वैवाहिक जीवनामध्ये कोणतेही अपत्य नाही.
एका मुलाखतीमध्ये आयशा जुल्का ने लग्न, करिअर आणि मुलांच्या बद्दल बोलली होती. आयशा ने २००३ मध्ये व्यावसायिक समीर वाशी सोबत लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला १९ वर्ष झाली आहेत. पण असे काय कारण आहे कि अजून पर्यंत ती आई बनू शकली नाही? याला उत्तर देताना आयशा सांगते कि – मी हा विचार केला होता कि कधीही लग्न करायचे नाही.
मला असे वाटायचे कि जर लग्न केले नाही तर अनेक गोष्टी केल्या असत्या. असे यासाठी कि मी वाईट नातेसंबंधांमध्ये होते. याचा परिणाम माझ्यावर झाला होता. मी कुटुंबातील सदस्यांना देखील माझ्या निर्णयाबद्दल सांगितले होते. ते देखील तयार झाले होते. त्यांना माझ्या या निर्णयाबद्दल कोणताही आक्षेप नव्हता.
टाइम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना आयशा सांगते कि – नंतर एकदा माझी आई आणि बहिण मेडिटेशन क्लास मध्ये समीर ला भेटल्या. त्यांना वाटले कि समीर माझ्यासाठी चांगला आहे. तेव्हा त्यांनी समीर ला मला भेटावले आणि आम्ही एकदमच जोडले गेलो. मुलांच्या प्रश्नावर आयशा सांगते कि – मी जीवनात खूपच चांगले वाईट प्रसंग पाहिले आहेत. त्यामुळे मी जेव्हा माझ्या पतीला माझ्या विचारांबद्दल सांगितले तेव्हा तो तयार होता.
समीर सोबत लग्नानंतर आम्ही गुजरात मधील दोन गावांना दत्तक घेतले. आम्ही तेथील १६० मुलांच्या खाण्याचे आणि शाळेचे लक्ष ठेवतो. मी त्यासगळया १६० मुलांची मुंबई ला आणून सांभाळ नाही करू शकत त्यामुळे मला तिथे गावात जावून त्याच्या भावनांना समजून घ्यावे लागते. हा निर्णय आम्ही स्वतःसाठी घेतला आणि आम्ही त्याला पूर्णपणे तयार होतो.
आयशा जुल्का च्या कामाबद्दल बोलाल तर ती आता ओटीटी शो मध्ये दिसत आहे. तिला ओटीटी प्लेटफॉर्म वर आणखी काम करायचे आहे. आयशा सिरीज हश हश मध्ये दिसली होती. आयशा च्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये कुर्बान, खिलाडी, जी जिता वही सिकंदर, मासूम, दलाल यांचा समावेश आहे.