HomeViralऑडी मधून चहा विकतो हा चहावाला, व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल...

ऑडी मधून चहा विकतो हा चहावाला, व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल…

इंटरनेटवर अनेक नवीन आणि वेगळ्या अंदाजामधील स्टोरी व्हायरल होत असतात. नुकतेच सोशल मिडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या सर्वांना हैराण करत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला एका ऑडी कारमधून चहा विकताना दिसत आहे. कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेली हि घातला सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

व्हिडीओ पाहून असे वाटते कि कार मालक आपल्या नवीन मार्केटिंग तंत्राचा भाग म्हणून ऑडी घेऊन आला आहे. असे काम करणाऱ्या तरुण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन युक्त्यांचा वापर करत असतात. आलिशान कारमधून चहा या तरुणाचे अनोखे मार्केटिंग तंत्र असल्याचे दिसते.

ashishtrivedii_24 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आहा व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे. रस्त्याच्या कडेला एका व्हाईट ऑडीच्या पाठीमागे काही लोक उभे असलेले दिसत आहेत. व्हिडीओमध्ये काही सेकंदासाठी एक आलिशान सेडानचे बूट पाहायला मिळत आहे. जे एक स्टेशनमध्ये बदललेले आहे जिथे चहा बनवला जात आहे. एका टेबलवर चहा आणि इतर पेय दिली जात आहेत.

सोशल मिडियावर शेयर होताच काही मिनिटांमध्ये हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि ३६१ हजार पेक्षा जास्त व्हिव मिळाले आहेत. याशिवाय छोट्या क्लिपवर सोशल मिडिया युजर्स अनेक प्रतिक्रिया देत आहेत. महागड्या आलिशान कारमधून चहा विकण्याची बिजनेस आयडिया अनेक युजर्सला हैराण करत आहे.

एका सोशल मिडिया युजर्ने पोस्टवर कमेंट करत याला बिजनेसचे नाव देत ऑडी चायवाला असे म्हंटले आहे. तर अनेक युजर्सने व्हिडीओवर फनी कमेंट्स देखील केल्या आहेत. काही युजर्सने म्हंटले आहे कि त्या व्यक्तीने ऑडी खरेदी केली आणि हप्ते भरण्यासाठी चहा विकत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts