भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ बद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शॉच्या मित्राच्या गाडीवर हल्ला झाला आहे. वास्तविक हा हल्ला क्रिकेटरसोबत सेल्फी घेण्यासाठी झालेल्या वादामधून झाला. या प्रकरणामध्ये ओशिवरा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हा व्यापारी पृथ्वी शॉचा मित्र आहे. पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र एका मोठ्या हॉटेलमध्ये भेटले. त्यानंतर त्यचा मित्र एयरपोर्ट कडे जात होता. त्यावेळी आरोपी सना गिल आणि शोभित ठाकुरने पृथ्वी शॉ सोबत सेल्फी घेण्याची जिद्द केली. पृथ्वी शॉसोबत सेल्फी घेतल्यानंतर दोन्ही आरोपी पुन्हा पुन्हा सेल्फी घेण्यासाठी जिद्द करत होते.
अशामध्ये हॉटेलच्या मालकाने दोघांना तिथून बाहेर पाठवले. यामुळे आरोपी नाराज झाले आणि त्यांनी पृथ्वी शॉ सोबत असणाऱ्या मित्रावर हमला केला. आरोपीने पृथ्वी शॉच्या मित्राला जोगेश्वरीच्या लोटस पेट्रोल पंपजवळ थांबले. आरोपी आणि त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने बेसबॉलने कारवर हल्ला केला. सुदैवाने पृथ्वी शाह त्या गाडीत नव्हते.
यानंतर आरोपीने प्रकरण शांत करण्यासाठी व्यावसायिकाकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्याने व्यावसायिकाला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देण्यात आली. व्यावसायिकाचा चालक तुटलेली कार घेऊन ओशिवरा पोलिस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपी सना गिल आणि शोभित ठाकूर यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम ३८४,१४३, १४८,१४९,४२७,५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपास करत आहेत.