भारत आणि ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी अश्विन आणि रविंद्र यांची मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली आहे. सामन्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ते सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. अश्विन आणि जडेजाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
ज्यामध्ये अभिनेता अक्षय कुमारच्या आवाजामध्ये ‘एक-तेरा एक मेरा’ वाला डॉयलाग बोलताना दिसत आहेत. यानंतर दोघे व्हिडीओमध्ये RRR चित्रपटामधील नाटु-नाटु गाणे वाजताना देखील दिसत आहे. हेच कारण आहे कि हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अश्विन-जडेजाने सिरीजमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
अश्विनने चार सामन्यांच्या मालिकेत चमकदार गोलंदाजी करत चारही सामन्यात २५ विकेट घेतल्या, शिवाय 86 धावा केल्या. अश्विनने वेळोवेळी विकेट घेतल्या आहेत. ज्यामुळे टीम इंडिया पहिल्या दोन टेस्टमध्ये जिंकण्यात सफल झाल. अश्विनने सिरीजमध्ये तीनवेळा पाचपेक्षा जास्त विकेट घेतल्या.
तर ६ महिन्यानंतर परतलेल्या रवींद्र जडेजाने देखील सिरीजमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. जडेजाने सिरीजमध्ये १३५ धावा बनवल्या त्याचबरोबर २२ विकेट देखील घेतल्या. यादरम्यान एक अर्धशतक देखील लगावले. रवींद्र जडेजाने या सिरीजमध्ये टेस्टमधील नंबर वन फलंदाज मार्नश लाबुसेनला चारवेळा आऊट केले. तर तीनवेळा स्टीव स्मिथ आऊट केले. दोन्हीहि खेळाडूंचे सिरीजमध्ये शानदार प्रदर्शन राहिले.
Ashwin – Jadeja spin duo on fire. (📷 : Ashwin Instagram) pic.twitter.com/tEeoSvSWiG
— Johns. (@CricCrazyJohns) March 13, 2023