HomeBollywoodअनेक वर्षांनंतर आशा पारेखने व्यक्त केल्या आपल्या वेदना, म्हणाली; मी तिला वाढदिवसाच्या...

अनेक वर्षांनंतर आशा पारेखने व्यक्त केल्या आपल्या वेदना, म्हणाली; मी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते आणि ती बेडवर ….

मोठ्या पडद्यावर अभिनेत्रींचा जबरदस्त अभिनय पाहायला मिळतो. त्याचबरोबर त्यांच्या सौंदर्याच्या चर्चा देखील अनेक वर्षे होत राहतात. आज भले हि कितीही नवीन अभिनेत्री आल्या तर दर्शकांच्या मनामधून ७० च्या दशकामधील अभिनेत्री कधीच जाणार नाहीत. तो काळ काही वेगळाच होता. त्यावेळी जबरदस्त अभिनय आणि सौंदर्याचा अनोखा संगम अभिनेत्रींमध्ये पाहायला मिळत होता. अशीच एक अभिनेत्री आहे आशा पारेख.

आशाने आपल्या फिल्मी करियरमध्ये जबरदस्त सफलता मिळवली पण तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अनेक चढ उतार आले. तिच्या काळामधील कलाकार त्यांच्या नातवांचे डेब्यू पाहत आहेत. तर आशाने अजूनदेखील लग्न केलेले नाही. तथापि असे नव्हते कि तिच्या आयुष्यामध्ये कधी प्रेम आले नाही पण प्रत्येकवेळी परिस्थिती अशी बनली कि ती कोणाच्या घरची वधू बनू शकली नाही.

आशाने आपल्या करियरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. वयाच्या फक्त १० व्या वर्षी ती स्टेज परफॉर्मेंस देऊ लागली होती. तिला परफॉर्म करताना प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बिमल रॉयने पाहिले आणि आपल्या चित्रपटामध्ये कास्ट केले. यानंतर आशाने आणखीन एक चित्रपट केला पण दोन्ही चित्रपट फ्लॉप झाले. आशा जेव्हा १६ वर्षांची होती तेव्हा तिने पुन्हा अभिनय क्षेत्रामध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. तिला गूंज उठी शहनाई चित्रपटासाठी कास्ट करण्यात येणार होते पण चित्रपट निर्मात्याने तिला हे सांगून काढून टाकले कि तिच्यामध्ये स्टार बनण्यासारखे काहीच नाही.

यानंतर प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक नसीर हुसैनने तिला शम्मी कपूरसोबत साईन केले. ती दिल दे के देखो चित्रपटामध्ये दिसली. हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट झाला होता. आशासाठी बॉलीवूडचे दरवाजे उघडे झाले. यादरम्यान आशा नासीर हुसैनच्या प्रेमात पागल झाली. दोघांच्या अफेयरच्या चर्चा त्यावेळी मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. पण हे नाते टिकणे कठीण होते कारण नासीर विवाहित होते.

ती म्हणाली होती कि नासीर हुसैन असे एकमेव व्यक्ती होते ज्यांच्यावर मी प्रेम केले. ते विवाहित होते. मला कधीच कोणाचे घर मोडायचे नव्हते. हा विचार देखील मला घाबरवून टाकत होता. यामुळे या नात्याला तिथेच संपवणे योग्य समजले. तथापि आज देखील आशाचे नासीर हुसैनच्या कुटुंबासोबत चांगले संबंध आहेत. नासीर सोबतच्या रिलेशनमुळे ती आजपर्यंत अविवाहित आहे.

तथापि नासीरशिवाय आशाच्या आयुष्यामध्ये आणखी एक व्यक्ती आली होती. एका अमेरिकन प्रोफेसरसोबत आशाची जवळीक वाढली होती. त्यावेळी तिच्या कुटुंबाला वाटले होते कि आशा आता लग्न करेल. याबद्दल बोलताना ती म्हणाली कि मी एकदा त्यांना भेटायला अमेरिकेला गेले होते. आम्ही दोघे कॅफेमध्ये बसलो होतो. रात्रीचे दोन वाजले होते. त्यांनी मला म्हंटले कि मी त्यांच्या आणि त्यांच्या एक्स गर्लफ्रेंडच्या मध्ये आली आहे. या एका वाक्याने माझे हृदय तुटले.

एकदा प्रोफेसरने आशाला गुजरातीमध्ये फोनवर बातचीत केली होती. त्यावेळी आशाला माहिती झाले कि तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बेडरूममध्ये होता. यानंतर आशाने निर्णय घेतला कि कोणाच्याहि आयुष्यामध्ये ती दुसरी महिला बनणार नाही. त्यानंतर तिने स्वतःला त्या अमेरिकन प्रोफेसरपासून वेगळे केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts