ड्र ग्ज प्रकरणात अडकल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शाहरुख खानचा लाडका आर्यन खानबद्दल सध्या खूपच चर्चा होत आहे. कारणहि तसेच आहे. माहितीनुसार असा दावा केला जात आहे कि आर्यन खान बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि डांसर नोरा फतेहीला डेट करत आहे.
तथापि या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे हे कोणालाही माहिती नाही. आर्यन खान आणि नोरा फतेहीच्या अफेयरच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होण्याचे एक छोटे कारण. आर्यन खान आणि नोरा फतेहीचे काही फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
नुकतेच समोर आलेल्या आर्यन आणि नोरा फतेहीच्या दोन फोटोंमुळे सध्या सोशल मिडियावर त्यांच्या डेटिंगच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहेत. दोघांचेहि वेगवेगळे फोटो समोर आले आहेत. या दोन्ही फोटोंमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. कॉमन गोष्ट हि आहे कि दोन्ही कलाकारांसोबत फोटो काढणारी व्यक्ती एकच आहे.
तथापि या छोट्या गोष्टीशिवाय आणखी कोणतीही गोष्ट समोर आलेली नाही. पण सोशल मिडियावर त्यांच्या अफेयरच्या चर्चा होण्यास पुरेसे आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर लोक खूपच मजेदार कमेंट्स करत आहेत. यादरम्यान लोकांनी अनन्या पांडेला देखील निशाण्यावर घेण्यास सुरुवात केली आहे.
एकाने दुखी मानाने विचारले आहे कि आता अनन्याचे काय होईल. तर दुसऱ्या एकाने बिचारी अनन्या असे लिहिले आहे. काही दिवसांपूर्वी अनन्या पांडेबद्दल एक बातमी आली होती कि ती आर्यन खानला डेट करत आहे. याशिवाय अनन्या पांडेने करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये सांगितले होते कि तिला आर्यन खानला डेट करायचे आहे.
आर्यन खानला त्याचे वडील शाहरुख खानप्रमाणे स्क्रीनवर काम करायचे नाही तर स्क्रीनच्या मागे राहून काम करायचे आहे. तो स्क्रिप्ट राइंटिंग आणि डायरेक्शन मध्ये आले नशीब अजमावत आहे. याशिवाय हि देखील बातमी आहे कि त्याने नुकतेच एका चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आहे.