युट्युबर अरमान मलिकच्या गरामध्ये छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका मलिकने मुलाला जन्म दिला आहे. युट्युबरने सोशल मिडियावर फोटो शेयर करून बाळाच्या जन्माचा खुलासा केला आहे. अरमान मलिकने ६ एप्रिल २०२३ रोजी इंस्टाग्रामवरून दोघी पत्नी कृतिका आणि पायल मलिकसोबत लेटेस्ट मॅटरनिटी फोटोशूटचे फोटो शेयर केले आहेत. अरमान काळ्या रंगाच्या सूटमध्ये हँडसम दिसत आहे. तर कृतिकाने ग्रीन कलरचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे आणि पायलने पिंक ड्रेस घातला आहे.
फोटो शेयर करत अरमान मलिकने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि फायनली गोली आई झाली, गेस करा मुलगा आहे का मुलगी. तुमच्या आशीर्वादाने दोघे बिलकुल ठीक आहेत. माहितीनुसार कृतिकाला मुलगा झाला आहे. सोशल मिडिया सध्या अरमान मलिकला चाहते शुभेच्छा देत आहेत. सध्या चाहते त्याच्या बाळाच्या फोटोची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका मलिकचे हे पहिले अपत्य आहे. तिचा तीनवेळा गर्भपात झाला होता. अरमानची पत्नी पत्नी पायल मलिक देखील जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. आता तिचा आठवां महिना सुरु आहे. अरमानची पहिली पत्नी पायलला एक मुलगा देखील आहे ज्याचे नाव चिरायू आहे.
अरमान मलिकने २०११ मध्ये पायल मलिकसोबत लग्न केले होते. यानंतर २०१८ मध्ये अरमानने पायलची मैत्रीण कृतिकासोबत दुसरे लग्न केले होते. सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यंच्या मतभेद झाले पण आज पायल आणि कृतिका यांच्यामध्ये चांगले संबंध आहेत.
View this post on Instagram